Kolhapur News : विशाळगड किल्ल्यावरील वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांमधून रोष वाढताना दिसत आहे. गडकोटांच्या संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी या विषयात पुढाकार घेऊन विशाळगडास अतिक्रमणे व धर्मांधतेच्या विळख्यातून मुक्त करावे, अशी अनेक शिवभक्तांनी पत्रव्यवहार, सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) आता मोठा निर्णय घेण्याची तयारीत आहेत. विशाळगड संदर्भात राज्यव्यापी बैठक आयोजित केली असून आंदोलनाची फोडी दिशा ठरवली जाणार आहे. याबाबतची माहिती स्वराज्य पक्षाने प्रेस नोटद्वारे दिली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी देखील स्वतः दीड वर्षांपूर्वी विशाळगडास प्रत्यक्ष पाहणीपर भेट देऊन गडावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत गडावर पशुपक्षी हत्या बंदी लागू करण्याचे निश्चित झाले होते. तसेच तीन महिन्यात गडावरील अतिक्रमणे हटविली जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते.
मात्र, स्थानिक राजकारण्यांनी आणलेला अडथळा व कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा प्रशासनाची अकार्यक्षमता यांमुळे ही कामे अर्ध्यातच बंद पडली. व गडावर पुन्हा एकदा अतिक्रमणे व धर्मांधता जोर धरू लागले आहेत, असे संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
विशाळगड मुक्ती संदर्भात माजी खासदार संभाजीराजे यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे दिसत असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे जाहीर बैठकीचे आयोजन केले आहे.
रविवारी (ता.7) सकाळी १०.३० वाजता कोल्हापूरातील शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक होत आहे. या बैठकीला राज्यभरातून शिवभक्त व दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.