Local Body Elections : इतके फटके बसलेत, त्यातून बाहेर पडणे अवघड! संभाजीराजेंना राजकारणात काय सतावतंय?

Sambhajiraje Chhatrapati on Upcoming Local Elections : कोल्हापुरात मीडियाशी बोलताना संभाजीराजेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेच निवडणूक लढण्याबाबत अद्याप ठरवले नसल्याचे म्हटले आहे.
Sambhajiraje
SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष-संघटना तयारीला लागल्या आहेत. नेते, पदाधिकाऱ्यांची पक्षांतरे वाढू लागली आहेत. त्यातच माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकप्रकारे धक्का दिला आहे.

कोल्हापुरात मीडियाशी बोलताना संभाजीराजेंनी निवडणूक लढण्याबाबत अद्याप ठरवले नसल्याचे म्हटले आहे. इतके फटके बसलेत त्यातून बाहेर पडणे अवघड आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वराज्य पक्षाने लढविण्याबाबत अद्याप काही ठरवलेले नाही. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू. निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून विचारविनिमय सुरू असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

प्रामाणिकपणे राजकीय पक्ष चालवणे आजच्या घडीला अवघड आहे. राजकारण आणि परखड बोलणे याचा मेळ बसत नाही. राजकारण हा पैशाचा खेळ, आमच्याकडे पैसा नाही. पक्ष संघटन सोपे नाही. पण काम करत राहणार, राजकारणात टिकणं हे खूप अवघड काम असल्याची खंत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

Sambhajiraje
Asaduddin Owaisi : ओवैसींनी कामच असं केलं की पंतप्रधान मोदीही विसरले नाहीत!

परळी येथील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावर बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, वाल्मिक कराडला जेलमध्ये घातल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत झाली असे म्हणता येणार नाही. येथील कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडली आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र नाही. हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. अशा गोष्टी चालू न देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली.

स्थानिक नागरिकांचा गैरसमज 

जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केली आहे की, स्थानिकांसोबत बैठक लावावी. जागतिक वारसा स्थळात पन्हाळगडाची नोंद झाल्यास आमची घरे जातील, याची भीती आणि गैरसमज पन्हाळगड वासियांमध्ये आहे. हा गैरसमज दूर केला पाहिजे. एकदा पन्हाळगड जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाला तर पर्यटन वाढेल, असेही संभाजी राजे छत्रपती म्हणाले.

Sambhajiraje
Indian Army : 'पाक'च्या निशाण्यावर होते गोल्डन टेम्पल; धक्कादायक माहिती समोर, भारताने असा केला मुकाबला

कायदेशीर मार्गाने किल्ले रायगड वरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी. या वाघ्या कुत्रा संदर्भात कोणत्याच इतिहास संशोधक, अभ्यासाकडे पुरावे नाहीत. हे राज्य सरकारला स्पष्ट दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूला तितकीच मोठी समाधी उभी करणे, ही दुर्दैवाची बाब आहे. ६ जून नंतर राज्य सरकारकडून समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. सर्व पक्षाच्या आणि आघाडीच्या सदस्यांना या समितीत घ्यावे. कायदा हातात घेऊन कोणतेही कार्य करणार नाही. ठराविक दोघेजणच याबाबत वक्तव्य करत असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com