Vishalgad Riot Case : विशाळगड हिंसाचार प्रकरण: 17 जणांना जामीन; तर सात जणांचा फेटाळला

Kolhapur Vishalgad : या सात जणांबाबत घटनास्थळावरील प्रत्यक्ष दर्शनी फोटो आणि व्हिडिओ हे स्टेटसच्या माध्यमातून लावले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
Kolhapur Court
Kolhapur CourtSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूरातील किल्ले विशाळगड येथील गजापूर येथील हिंसाचार प्रकरणातील 17 जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर उर्वरित सात जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

फिर्यादीच्या वकिलांनी या सात जणांबाबत घटनास्थळावरील प्रत्यक्ष दर्शनी फोटो आणि व्हिडिओ हे स्टेटसच्या माध्यमातून लावले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरून त्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती आहे.

गजापूर येथे 14 जुलै रोजी हिंसाचाराचा प्रकार घडला होता. त्यात पोलिसांनी 500 हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला होता. एकीकडे त्याचा तपास सुरू असून दुसरीकडे कोल्हापूर Kolhapur पोलिसांनी ओळख पटवून 24 जणांना अटक केली होती.

अटकेत असलेल्या संशयितांबाबत मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत जिल्हा सत्र न्यायालयाने 24 पैकी 17 जणांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. तर सात जणांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Kolhapur Court
Prajakt Tanpure Vs Shivaji Kardile : 'साडेचार वर्षे झोपून होते, आता दरबार घेऊ लागलेत'; आमदार तनपुरेंचा कर्डिलेंना टोला

जामीन फेटाळलेल्या आरोपींत गोकुळ, शिरगांव, इचलकरंजी, पुणे व कसबा बावडामधील तरुणांचा समावेश आहे. चेतन जाधव, आदित्य उलपे, ओंकार साबळे, सिद्धार्थ कटकधोंड, ओंकार चौगुले, सूरज पाटील, ओंकार रजपूत या सात जणांचे घटनास्थळ यांचे फोटो मिळाल्याने यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्याने या सात संशयितांच्या जामीनासाठी त्यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे त्यांना जामीन मिळणार का, याकडे लक्ष आहे.

Kolhapur Court
Raju Dindorle : मनसेच्या जिल्हाध्यक्षावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, बँकेच्या संचालकांना केली मारहाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com