Sudhir Gadgil : पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का! आमदाराने घेतला मोठा निर्णय

Sudhir gadgil Decision not to contest election : राजकारणात कधीतरी थांबावे लागते, या मताचा मी आहे. मला दोनदा विधानसभेची संधी मिळाली. आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असे माझे प्रमाणिक मत आहे, असे आमदार गाडगीळ म्हणाले आहेत.
Sudhir gadgil
Sudhir gadgilsarkarnama
Published on
Updated on

Sudhir Gadgil News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. पश्चिम महाराष्ट्राचा गड महाविकास आघाडीने आपल्याकडेच ठेवल्याचे निकालातून दिसले. भाजपने सातारा आणि पुण्याची जागा जिंकली. मात्र, सांगलीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यात विधानसभेच्या तयारीत लागलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सांगली मतदारसंघाचे सलग दोनदा नेतृत्व करणारे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचे जाहीर केले आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या विजयासाठी प्रयत्न करू, असे देखील गाडगीळ यांनी सांगितले आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे गाडगीळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. त्यांनी आपले समर्थन काँग्रेसला दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सकारात्मक वातावारण आहेत. त्यात भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा लढण्यास आपण इच्छुक नसून पक्षाकडे उमेदवारी मागणार नसल्याचे जाहीर केले आहे.

राजकारणात कधीतरी थांबावे लागते, या मताचा मी आहे. मला दोनदा विधानसभेची संधी मिळाली. आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असे माझे प्रमाणिक मत आहे, असे गाडगीळ म्हणाले आहेत.

गाडगीळ यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला आहे. गेल्या दहा वर्षांत अनेक प्रश्न मार्गी लावले. जे प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गाडगीळ यांनी म्हटले आहे. तसेच राजकारणातून थांबत असलो तरी संघटनात्मक कामात सक्रीय राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

भाजपचा उमेदवार कोण?

विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने भाजपला नवीन उमेदवार शोधण्यात अडचण येणार नसल्याची चर्चा आहे. संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्याला संधी देणार की उमेदवार दुसऱ्या पक्षात आयात करणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे.

Sudhir gadgil
Sandeep Dhurve : भाजप आमदाराचा 'चांदी के डाल पर...' डान्स; तेही गौतमी पाटीलच्या पुढ्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com