
थोडक्यात बातमीचा सारांश :
इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर तर निजामवाडीचं नाव रायगडवाडी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनात घेतला.
या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, कारण त्यांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.
भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर पलटवार करत त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Sangli News : पावसाळी अधिवेशनात सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या गावाचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. तसेच रायगड जिल्ह्यातील निजामवाडीच्या नावातही बदल करण्यात येणार आहे. इस्लामपुरचे ईश्वरपूर आणि निजामवाडीचे रायगडवाडी असा बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवला जाईल अशी माहिती अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी यावर नाराजी व्यक्त करताना, मी त्या मतदारसंघाचा आमदार आहे. लोकांनी मला निवडून दिलं आहे. किमान याची कल्पना सरकारने मलातरी द्यायला हवी होती, पण तसे झाले नाही. फक्त धार्मिक गोष्टीकडे बघत हा निर्णय घेतला गेला. पण तेथील ऐतिहासिक विचारात घेतला गेला नाही, अशी टीका केली होती. दरम्यान आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Gopichand Padalkar hits back at Jayant Patil over Islampur renaming controversy)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विटामध्ये भाजपकडून कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. याच मेळाव्यात पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाना साधत जोरदार टीका केली. तसेच त्यांनी, सांगली जिल्ह्याताल खानापूर, सुलतानगादे या गावाची देखील लवकरच नावे बदलायचे संकेत दिले. तर यासाठी त्या त्या गावांनी देखील प्रस्ताव द्यावेत असेही म्हटलं आहे.
यावेळी पडळकर यांनी, इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर होत असल्याने जयंत पाटलांच्या तळपायातील आग मस्तकात गेलीय. त्यांचा संताप झाला, असा दावाही त्यांनी केला. तसेच त्यांनी, काही लोकांना पुढे करून जयंत पाटलांनी ईश्वरपूर नावाला विरोध केल्याचा केला. पण आता यापुढे हिंदूंना विरोध करणाऱ्यांना ठेचून काढू असा इशारा पडळकरांनी दिला.
इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांना डिवचले. त्यांनी, राज्य सरकारने इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यास मंजुरी देत तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. पण आता काही लोकांची झोप उडाली आहे. ते मला न विचारता हे नाव कसे काय बदलला? असा सवाल करत आहेत. या लोकांच्या तळपायातील आग मस्तकात गेलीय असा टोला पडळकरांनी जयंत पाटलांना लगावला आहे.
इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केल्यावर ज्यांना थेटपणे बोलता येत नाही, त्यांनी काही लोकांना पुढे केले. ईश्वरपूर नावाला विरोध केला. पण इथून पुढे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचून काढू असा इशाराही पडळकर यांनी दिला.
विधानभवन आवारात झालेल्या मारहाण प्रकारातील आरोपी असणाऱ्या ऋषी उर्फ सर्जेराव टकले याचे कौतुक आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं. दुष्काळी भागाचे नाव कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. नेत्यासाठी जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते हे फक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत, असेही ऋषी उर्फ सर्जेराव टकलेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी कौतुक केले. ऋषी उर्फ सर्जेराव टकले हा आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असून विधानभवनमध्ये झालेल्या मारहाण घटनेत टकलेचे नाव समोर आल्याचे ते म्हणाले.
1. इस्लामपूरचं नाव का बदलण्यात आलं?
– धार्मिक आणि ऐतिहासिक मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नाव बदलाचा निर्णय घेतला.
2. कोणत्या नावाने इस्लामपूरचं नामकरण होणार आहे?
– इस्लामपूरचं नाव "ईश्वरपूर" असं करण्यात येणार आहे.
3. जयंत पाटील यांनी नेमकी नाराजी का व्यक्त केली?
– त्यांनी आरोप केला की, मी त्या मतदारसंघाचा आमदार असूनही मला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही.
4. गोपिचंद पडळकर यांचे काय म्हणणे आहे?
– त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करत त्यांचा विरोध हा निव्वळ राजकीय असल्याचं म्हटलं.
5. आता पुढे काय होणार?
– हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, अंतिम निर्णय त्यांच्याकडून होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.