Sangli Politics : सुधीर गाडगीळांची सहनशक्ती संपली; भाजपमधील निष्ठावंतांच्या खांद्यावर बंदूक ठेवतं थेट चंद्रकांतदादांवर निशाणा

Sangli Local Body Election 2025 Chandrakant Patil Vs Sudhir Gadgil: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेनंतर भाजपमधील जुना कार्यकर्ता दुखावला गेला आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सांगली जिल्ह्यात भाजप टिकवण्यामागे या कार्यकर्त्यांचा हात आहे.
Sangli Local Body Election 2025 Chandrakant Patil  Vs Sudhir Gadgil
Sangli Local Body Election 2025 Chandrakant Patil Vs Sudhir GadgilSarkarnama
Published on
Updated on

Sangali News : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील जुने निष्ठावंत आणि नव्या पदाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारीबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर निष्ठावंतांची नाराजी ओढावली आहे. अशातच निष्ठावंतांच्या बाजूने भाजपचे नेते, आमदार सुधीर गाडगीळ उभे राहिले आहेत. गाडगीळ यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेविरोधातच आक्षेप घेत लेटरबॉम्ब टाकला.

मात्र हा लेटरबॉम्ब टाकण्यामागचे खरे कारण वेगळेच असल्याची शंका उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता आमदार सुधीर गाडगीळ यांचा तथाकथित निष्ठावंतांची बाजू घेण्याचा प्रयत्न दिसत असला तरी त्याला अंतर्गत वाद कारणीभूत आहे. इतकेच नव्हेतर थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न आमदार गाडगीळ यांचा दिसत आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांसह आता सांगली जिल्ह्यात ही भाजप काँग्रेसमय होत आहे. काँग्रेसमधून जयश्री पाटील यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील भाजपमध्ये आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे मैदानात होते. अपक्ष जयश्री पाटील या गाडगीळ यांच्या विरोधात लढल्या.

अशा परिस्थितीत दोघांनाही भाजपमध्ये घेतल्यानंतर साहजिकच गाडगीळ यांची राजकीय कोंडी चंद्रकांत पाटील यांनीच केल्याचे दिसते. मागील आठवड्यात पालकमंत्री पाटील हे थेट जयश्री पाटील यांच्या घरी जात तिथे त्यांनी सर्व नूतन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमोर आधी आलेल्या आता आलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाईल, असे जाहीर करून टाकले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेनंतर भाजपमधील जुना कार्यकर्ता दुखावला गेला आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सांगली जिल्ह्यात भाजप टिकवण्यामागे या कार्यकर्त्यांचा हात आहे. पण नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतल्यानंतर साहजिकच भाजप अंतर्गत असणारा तथाकथित निष्ठावंत कार्यकर्ता नाराज झाला आहे. त्यामुळे आमदार सुधीर गाडगीळ यांनी काल सर्व निष्ठावानांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत कथित लेटर बॉम्ब टाकला.

Sangli Local Body Election 2025 Chandrakant Patil  Vs Sudhir Gadgil
Kerala Assembly Election: देशातील एकमेव बालेकिल्ला राखण्याचे डाव्यांसमोर आव्हान

जे मागील काही वर्षाचं सांगलीतील राजकारण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून सुधीर गाडगीळ यांनीच या ठिकाणी आपला तंबू ठोकला आहे. विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असताना जयश्री पाटील आणि मदन पाटील यांच्या कार्यकर्त्यांची राजकीय पुनर्वसन करण्यासाठी धडपड दिसत होती. त्यामुळे भाजपमध्ये पक्षप्रवेश करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका जयश्री पाटील यांनी घेतल्याचे दिसते.

त्या ठिकाणी असणारा भाजपचा मूळ कार्यकर्ता या सर्व प्रकारानंतर अस्वस्थ आहे. भाजप गेल्या तीन टर्ममध्ये काँग्रेसमधील रसद आयात करीत विस्तारला आहे. त्यामुळे संघ विचारांचे भाजप विचारांचे असे काही त्यांच्याकडे फार आहे. अशातला भाग नाही मात्र तीन टर्म गाडगीळांसोबत प्रत्येक विधानसभेला राहिलेले असे बरेच कार्यकर्ते उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. आता शतप्रतिशत भाजपचे वातावरण (त्यांच्या मते) असताना तरी उमेदवारी मिळेल का याबद्दल सर्व साशंक आहेत. आमदार गाडगीळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना पत्र देऊन अशा सर्व कार्यकर्त्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे.

पण आता आमदार गाडगीळांना असे पत्र प्रसिद्धीसच का द्यावे लागले? निष्ठावानांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपच्या आमदाराला असे पक्षाच्या वरिष्ठांकडे देण्याऐवजी दैनिकांकडे द्यावे लागते हे कशाचे लक्षण आहे. वास्तविक गाडगीळ हे तीन टर्म आमदार असले तर वरिष्ठ पातळीवर दादांच्या विरोधात निर्णय घेतील असे कदाचित गाडगीळ यांना वाटले नसावे. त्यामुळे सहाजिकच प्रसार माध्यमांतून दबाव निर्माण करून निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि जयश्री पाटील यांच्या कार्यकर्त्याला आणि गटावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार गाडगीळ यांचा दिसतो.

गेल्या काही दिवसांत पालकमंत्री पाटील यांच्या सांगली दौऱ्यात सांगली आणि मिरजेच्या आमदारांसह जुने कार्यकर्ते दूरच दिसत आहेत. त्यामुळे जुने-नवे वाद उफाळणारच याची शक्यता वर्तवली जात होती. या वादास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या चालीही कारणीभूत होत्या. महापलिकेची धुरा आपल्याकडे आहे, अशी वातावरण निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. त्यांचे 'स्पॉन्सर्ड इव्हेंट' असोत की कार्यकर्त्यांनी लावलेली वाढदिवसाची डिजिटल्स यावरून गाडगीळांचे छायाचित्र गायब झाल्याचे दिसत होते. गाडगीळांच्या लेटर बॉम्बमध्ये इनामदार यांच्यावर थेट रोख नाही. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीत काहींनी विरोधात काम केल्याचा आणि त्यांचा लेखाजोखा पक्षाला सादर करण्याचा इशारा दिला आहे, तो इशारा पुरेसा बोलका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com