Vishwajeet Kadam News : 'सांगलीत कदम हे पाटलांच्या पाठीमागे; पण कुठल्या ? हे 4 जूनला कळेल'

Political News : सांगलीच्या जागेसाठी भाजपचे संजयकाका पाटील , विशाल पाटील, शिवसेनेच्या चंद्रहार पाटील अशी तीन पाटलांमध्ये खरी लढाई असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या तीन पाटलांच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.
Vishal Patil, Dr. Vishwajeet Kadam, Chandrahar Patil
Vishal Patil, Dr. Vishwajeet Kadam, Chandrahar PatilSarkarnama

Sangli News: सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून मोठा तिढा निर्माण झाला होता, त्यांनतर ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासह काही काँग्रेसचे स्थानिक नेते आग्रही होते. पण सांगलीचा उमेदवार शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केल्याने काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. ही जागा काँग्रेसला सुटावी, यासाठी दिल्ली दरबारी त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यामध्ये यश आले नाही.

जागावाटपात ही जागा शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी (Vishal Patil) या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. 7 मे रोजी सांगली लोकसभेसाठी मतदान झाले. सांगलीच्या जागेसाठी भाजपचे संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) , विशाल पाटील, शिवसेनेच्या चंद्रहार पाटील अशी तीन पाटलांमध्ये खरी लढाई असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या तीन पाटलांच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. तीन पाटलामध्ये झालेली लढतीबद्दल सर्वच गटाकडून विजयाचे दावे केले जात आहेत. (Vishwajeet Kadam News News)

Vishal Patil, Dr. Vishwajeet Kadam, Chandrahar Patil
Arvind Kejriwal : 21 दिवस, 3 राज्य, 4 टप्पे अन् 5 अटी; केजरीवाल गाजवणार मैदान

जागावाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. 7 मे रोजी सांगली लोकसभेसाठी मतदान झाले. सांगलीच्या जागेसाठी भाजपचे संजयकाका पाटील, विशाल पाटील, शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्यामध्येच खरी लढाई असल्याची चर्चा आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता चांगलीच चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमावेळी नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार कदम यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वांचेच त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

आमदार विश्वजीत कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चा रंगली आहे. विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत, कदमांचे आणि पाटलांचे चांगलं नातं आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, 'बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे' असे म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. त्यानंतर बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत, कदमांचे आणि पाटलांचे चांगले नातेसंबंध आहेत. त्याशिवाय कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल, असे सूचक वक्तव्य यावेळी विश्वजीत कदम यांनी केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यमुळे चर्चा रंगली आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारवेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, विशेषतः काँग्रेसचे नेते जरी शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटलांच्या व्यासपीठावर दिसत होते. तरी त्यांनी विशाल पाटलांच्या मागे आपली ताकद लावल्याची, त्यांना छुपी मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सांगलीच्या तीन पाटलांच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vishal Patil, Dr. Vishwajeet Kadam, Chandrahar Patil
Vishwajeet Kadam: सांगलीसाठी विश्वजीत कदमांनी टोकाची भूमिका का घेतली ? | Sangali Loksabha

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com