Vishal Patil : अपक्ष असल्याने तुम्ही म्हणाल त्याठिकाणी येण्याची माझी तयारी; खासदार पाटलांचे भाजप नेत्यासमोर सूचक विधान

Sangli Fish Market News : राणे कुटुंबीय आणि वसंतदादा घराण्याचे खूप चांगले संबंध राहिले आहेत. नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. तेव्हा जी पोटनिवडणूक झाली, त्याच काळात प्रकाशबापू यांचं निधन झाल्यांतर प्रतीकदादांची (माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील) निवडणूक झालेली होती.
Nitesh Rane-Vishal Patil
Nitesh Rane-Vishal PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 10 January : ‘मच्छी मार्केटची इमारत होत असताना आयुक्तांनीही वैयक्तिक लक्ष घातले आहे. सगळ्या मागण्या आणि त्रुटींबाबत त्यांनी सहकार्य केलेले आहे. अजूनही केंद्राचा निधी आहे. आम्ही अपक्ष खासदार असल्याने गरजेप्रमाणे तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी यायला आम्ही तयार आहोत,’ असे सूचक विधान सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी भाजपचे मंत्री नीतेश राणे यांच्याकडे पाहत केले.

सांगली येथील मच्छी मार्केट इमारतीचे भूमिपूजन राज्याचे बंदरे आणि मत्स्य मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी हे महत्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले, मच्छी मार्केटच्या निधीसाठी दिल्लीतून आपण प्रयत्न करू. राणे आणि वसंतदादा घराण्याचे संबंध तुम्हाला आताच सांगितले आहेत. त्यांच्याकडेही प्रयत्न करू. खासदार फंडातूनही निधी देण्यात येईल. पण मच्छी मार्केटचा प्रकल्प चांगला करण्याचा प्रयत्न होईल.

विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले, मी एका कार्यक्रमाच्या मधून आलो आहे. मला पुन्हा त्या कार्यक्रमाला जावं लागणार आहे, त्यामुळे मी कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांची परवानगी घेऊन बोलत आहे. सांगलीकरांच्या वतीने, सांगलीचा खासदार म्हणून नीतेश राणे यांचे स्वागत करतो. राणे कुटुंबीय आणि वसंतदादा घराण्याचे खूप चांगले संबंध राहिले आहेत. नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. तेव्हा जी पोटनिवडणूक झाली, त्याच काळात प्रकाशबापू यांचं निधन झाल्यांतर प्रतीकदादांची (माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील) निवडणूक झालेली होती.

Nitesh Rane-Vishal Patil
Suresh Dhas : राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण? सुरेश धसांचे सूचक भाष्य...

नारायण राणे यांनी त्यावेळी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आणले होते. त्याच वेळी प्रतीक पाटील हे खासदार झाले होते. निवडून आणल्यानंतर नारायण राणे हे जेव्हा दिल्लीला सोनिया गांधी यांना भेटायला जाताना प्रतीक पाटील यांना सोबत घेऊन गेले होते. प्रकाशबापूंच्या निधनानंतर नारायण राणे यांनी आम्हा दोघा भावांवर खूप प्रेम दिले, असेही विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, आज तुम्ही मंत्री झालात आणि आम्ही खासदार झालो. दोघं मिळून एका व्यासपीठावर आलो आणि सांगलीसाठी एका चांगल्या कार्यक्रमाचा नारळ फोडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी देवाचेही आभार मानतो. पाटील आणि राणे कुटुंबाला एकत्र काम करण्याची संधी मिळो, अशी अपेक्षाही खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली.

Nitesh Rane-Vishal Patil
Sanjay kaka Patil : सांगलीत अजितदादांना मोठा धक्का? संजयकाका पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर; 'घड्याळा'ची साथ सोडणार?

सांगलीत एक चांगली वास्तू उभारत आहे, त्याचा आनंद आहे. स्वातीताईंचा मला अनेक दिवसांपासून मासे खायला येण्याचा आग्रह आहे. आता नवीन मच्छी मार्केटमधीलच मासे खाण्याचा योग आहे की काय? कुणास ठाऊक. तोपर्यंत आमचीही थांबण्याची तयारी आहे. सांगलीत सर्व धर्माचे लोक खेळीमेळीने राहतात आणि व्यवसाय करतात. मच्छी मार्केटमध्येसुद्धा भोई, मुस्लिम समाज खेळीमेळीतून काम करतात, असा दावाही करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com