Sangli Election: सांगलीत वारं फिरलं, अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीची साथ सोडणार,स्वबळाची तयारी ? भाजपनेही प्लॅन बदलला

NCP Alliance Rift : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी स्वतंत्र लढतीच्या तयारीत दिसत असून भाजपने हा डाव ओळखत नव्या युती व रणनीतीवर भर दिला आहे.
BJP and NCP leaders engage in strategic discussions amid growing uncertainty over Mahayuti unity ahead of the Sangli Municipal Corporation elections.
BJP and NCP leaders engage in strategic discussions amid growing uncertainty over Mahayuti unity ahead of the Sangli Municipal Corporation elections.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli news : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे महायुतीत आल्यानंतर दोन गटात विभागली गेली. यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत आपला दबदबा दाखवून दिला. याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिकडे सत्ता तिकडे वाट असं तत्व धरुन अनेकांनी राष्ट्रवादीला सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जवळ केले आहे. दिवसेंदिवस राष्ट्रवादीचा भरणा वाढत असल्याने सांगली महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसला 'अच्छे दिन'आल्याचे चित्र आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीला जयंत पाटील वगळता खमके नेतृत्व मिळत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र शहरातील मातब्बर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर प्रबळ बनली आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादीत अनेकांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सध्या सर्वच जागांवर चाचणी करताना दिसत आहे.

सांगली महानगरपालिकेच्या तोंडावर दोन माजी महापौरांसह सहा माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे काही काळ पोकळ राहिलेल्या राष्ट्रवादीला शहरात बळ मिळाले आहे. आणखी काही मंडळी रांगेत उभी आहेत. अजित पवार यांच्या पक्षाला यानिमित्ताने बाळसे यायला लागले आहे. परिणाम स्पष्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर स्वतंत्र लढण्याची तयारी करताना दिसत आहे.

भाजपने हा डाव ओळखून शिवसेना, रिपाइं, जनसुराज्य, 'रयत' सोबत बोलणी पुढे रेटली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जयश्री पाटील यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. त्या आल्या असत्या तर मनपासाठी हा मोठा पक्ष ठरू शकला असता. भाजपने तो डाव उधळून लावत श्रीमती पाटील यांना भाजपमध्ये घेतले. परंतु, भाजप ज्या प्रभागात फिका पडतो, त्या ठिकाणच्या मातब्बरांनी 'थांबा आणि पाहा,' अशी भूमिका घेतली होती. त्यांनी आता फटाफट निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

BJP and NCP leaders engage in strategic discussions amid growing uncertainty over Mahayuti unity ahead of the Sangli Municipal Corporation elections.
Sangli Congress News : ...अखेर विश्वजित कदमांवर विशाल पाटील ठरले भारी; शहराध्यक्षपदासाठी हुकमी एक्का काढला बाहेर

78 जागांवर लढायचे की अन्य पक्षांसोबत जाऊन भाजप विरोधात चक्रव्यूह रचायचा, हे मात्र गुलदस्त्यात आहे. राज्यात सगळीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकेल का, याची चाचपणी करण्याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीने एकत्र येऊन भाजपला शह द्यावा, अशी शरद पवार यांची इच्छा दिसते आहे. या डावात अजित पवारांची राष्ट्रवादी किती गंभीर होते आणि सांगलीसारख्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस व अन्य एकत्र येऊ शकतील काय, यावर आता चर्चा झडल्या आहेत.

BJP and NCP leaders engage in strategic discussions amid growing uncertainty over Mahayuti unity ahead of the Sangli Municipal Corporation elections.
BJP News : शरद पवारांच्या आमदाराचा मुलगा भाजपमध्ये : प्रचंड विरोधामुळे CM फडणवीसांना घालावं लागलं लक्ष : पक्षप्रवेशाची Inside Story

भाजपसोबत 'अंडरस्टॅडिंग?' भाजपसोबत (BJP) सत्तेत गेल्यानंतरही अजित पवार यांनी सतत, 'शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराने चालू,' असे म्हटले आहे. हा मुद्दा या निवडणुकीत कळीचा असणार आहे. भाजपला काही प्रभागांत मुस्लिम, दलित मते मिळणार नाहीत. त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झुकते माप द्यावे, असे धोरण राहू शकते का, हा 'अंडरस्टैंडिंग'चा मामला आहे का, अशा शंकादेखील विचारल्या जात आहेत. हा भाग महत्त्वाचा मानला जातोय.

साटेलोटे शक्यता?

महायुती होणार की स्वतंत्र लढणार, याचा फैसला दोन-चार दिवसांतच होईल. 'राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सर्व 78 जागांवर लढायला तयार आहे, असे आमदार इंद्रनील नायकवडी यांनी म्हटले आहे. संदेश स्पष्ट आहे की, भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादीला पुढे जायचे आहे. हे करताना भाजपचे प्यादे व्हायचे की भाजपला आव्हान देत प्रसंगी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी साटेलोटे करायचे, याचा फैसला कसा होतोय, यावर बरेच काही अवलंबून असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com