BJP News : शरद पवारांच्या आमदाराचा मुलगा भाजपमध्ये : प्रचंड विरोधामुळे CM फडणवीसांना घालावं लागलं लक्ष : पक्षप्रवेशाची Inside Story

BJP Operation Lotus : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ऑपरेशन लोटस राबवत सुरेंद्र पठारे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला असून यामुळे पुणे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Surendra Pathare’s BJP entry in Pune highlights Operation Lotus strategy ahead of municipal elections
Surendra Pathare’s BJP entry in Pune highlights Operation Lotus strategy ahead of municipal electionsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुण्यात ऑपरेशन लोटस यशस्वी केले आहे. पुण्यातील मातब्बर 11 नेत्यांना भाजपने पक्षप्रवेश दिला आहे. मात्र या सर्व पक्षप्रवेशांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. पण स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रवेशाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबाबत शहराध्यक्षांना पत्र देत अशा प्रकारचे प्रवेश घडून आणू नका अशी मागणी केली होती.

भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा देखील सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशाला विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. पण हे सर्व विरोध डावलून त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. यामागे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंनीच लक्ष घातलं असल्याने हे शक्य झाल्याचे सांगितले जाते.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनी भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वडगाव शेरीतून निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता, अवघ्या एका वर्षातच सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये 'वापसी' केली आहे.

Surendra Pathare’s BJP entry in Pune highlights Operation Lotus strategy ahead of municipal elections
Pune Municipal Election : भाजपनं फिरवली चक्रं; राष्ट्रवादी अन् सेनेला अंधारात ठेवून टाकणार मोठा डाव...

सुरेंद्र पठारे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील 'यंग ब्रिगेड' चे सक्रिय सदस्य होते. शरद पवारांसोबत जातानाही त्यांनी फडणवीस यांची परवानगी घेतली होती, देखील सांगितले जाते. मात्र, आता भाजपमध्ये परतताना स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे काही अडचणी आल्या

यापूर्वी दसरा आणि दिवाळीदरम्यान, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची चर्चा होती, त्याबाबत विमाननगरमधील एका हॉटेलमध्ये बैठकही झाली. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रवेश रखडला होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्तक्षेपाने प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

Surendra Pathare’s BJP entry in Pune highlights Operation Lotus strategy ahead of municipal elections
Mahayuti Politics: ‘ऑपरेशन लोटस’चा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झटका?; भाजप स्वबळाच्या तयारीत?

शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भाजपची ताकद असली तरी उपनगरांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपकडून हे प्रवेश दिले जात आहेत. वडगाव शेरी परिसरातील पाच ते सहा जागांवर पठारे यांच्या कुटुंबाचा थेट प्रभाव आहे. त्यामुळे हा प्रवेश करून भाजपने कुठेतरी आपल्या 125 नगरसेवकांचा टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावला टाकली असल्याचे बोलले जात आहे.

Surendra Pathare’s BJP entry in Pune highlights Operation Lotus strategy ahead of municipal elections
Pune Politics : शरद पवार की अजित पवार, कोणासोबत जायचं? राष्ट्रवादीच्या नेत्याने सरळ निवृत्तीच घेतली; अख्खा वॉर्ड भाजपच्या झोळीत

भाजपने दिलेले बहुतांश प्रवेश हे उपनगरामधूनच दिल्याचं समोर आला आहे. वडगाव शेरी मतदारसंघासह खडकवासला मतदारसंघांमध्ये देखील भाजपने मोठे प्रवेश करून आणले आहे. त्यामुळे ज्या भागात अजित पवार यांच्या पक्षाची ताकद आहे. त्या ठिकाणीच भाजपने प्रवेश घडून आणल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये सुरेंद्र पठारे यांच्यासह विकास दांगट, सायली वांजळे, बाळा धनकवडे, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, सतिश लोंढे, खंडू लोंढे, प्रतिभा चोरगे, पायल तुपे आणि सचिन दोडके यांचा समावेश आहे. हा प्रवेश पुणे आणि परिसरातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com