Sanjay Raut & Ajit Pawar
Sanjay Raut & Ajit PawarSarkarnama

NCP MLA Politics : अजितदादांच्या शिलेदाराचा राऊतांना थेट इशारा, महायुतीलाही दम; म्हणाले, '11 माजी नगरसेवक आमच्या संपर्कात'

Idris Naikwadi On Local body elections : सध्या आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. तळ कोकणापाठोपाठ सांगली जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या नेत्याने स्वबळाचा नारा दिला आहे.
Published on
Summary
  1. आमदार इद्रिस नायकवाडी यांनी संजय राऊत यांच्यावर अजित पवारांवर केलेल्या टीकेसाठी कठोर इशारा दिला.

  2. नायकवाडी म्हणाले की, राऊत यांनी खालच्या पातळीवरील टीका केली असून अशी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत.

  3. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी महायुतीतील युतीवर निर्णय झालेला नसून गरज भासल्यास स्वबळावर लढण्याचा निर्धारही व्यक्त केला.

Sangli News : गेल्या काही महिन्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत खालच्या पातळीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत टीका करताना दिसत आहेत. यावरून त्यांची जीभ हासडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी दिला आहे. यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी महिनाभरापूर्वीच अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद होईल असे वक्तव्य केले होते. यानंतर अचानक त्यांनी आपला सूर बदलला आणि अजित पवार यांच्यावर खालच्या टोलावर जाऊन टीका केली. भारत-पाकिस्तान सामन्यावरून अजित पवार यांनी खेळाकडे खेळाच्या दृष्टीकोनातून पाहावं, असे म्हटले होते. त्यावर राऊत यांनी ते मूर्ख राजकारणी असून अर्धे पाकिस्तानी असल्याची टीका केली होती. तसेच अजित पवार पाकड्या असून राज्यातील मंत्र्यांची ही भाषा असेल. योग्य नाही. ती राष्ट्रभक्ताची भाषा नाही. अजित पवार जे 26 लोक गेले, त्यांच्यात तुमच्या घरातील कोणी असते तर तुम्ही असं बोललाच नसता, असाही दावा राऊत यांनी केला होता.

या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते राऊत यांच्यावर टीका करताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील त्याचे आमदार नायकवाडी यांनी देखील यावर निषेध व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्यावर बोलण्याआधी राऊत यांनी विचार करावा. अन्यथा त्यांची जीभ हासडण्यात येईल, असा इशारा देताना राऊत यांचीच डीएनए चाचणी करून घ्यावी, असा पलटवार केला आहे. तर अजित पवार यांच्या विरोधात बोलल्यास राऊतांना मोठी किंमत मोजावी लागेल, असाही इशाराही त्यांनी दिला आहे.

Sanjay Raut & Ajit Pawar
Local Body Elections : ZP, महापालिकांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने आयोगाला ठणकावले, कालावधीही ठरवून दिला...

यावेळी नायकवाडी म्हणाले की, ज्यांना सगळेजण भोंगा म्हणतात. दररोज सकाळी नऊ वाजता वाचतो. अलीकडच्या काळात भोंग्याचा आवाज गायब झाला होता. पण राऊत यांनी काल फार खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांनी अजित पवार यांच्याबाबत खालच्या पातळीवर भाषा वापरली. अशा लोकांची आता कीव येते. महिना झाला नाही, तोच राऊत आपल्या शब्दापासून फिरले आहेत.

तसेच अजितदादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले असून ते मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल. कारण ते मुख्यमंत्रीपद झेलण्यास सक्षम आहेत. ते एक चांगला नेता आहेत. त्यांच्यात काम करण्याची धमक आहे, असा टोला नायकवाडी यांनी लगावला आहे. अजितदादांवर केलेली टीका राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता खपवून घेणार नसून यापुढे बोलण्याआधी भान ठेवून बोलावे,’’ असा इशारा आमदार इद्रीस नायकवडी यांनी दिला.

यावेळी आमदार नायकवडी यांनी होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील रणनीती आखल्याचे सांगितले. त्यांनी येथे आपल्याला अधिक वेळ देता यावे यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असेही सांगितले. न मागता आपल्याला अजितदादांनी आपल्याला भरपूर दिलं असून विधान परिषदेवर संधी दिलीय. सांगली महापालिकेतील अकरा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून परिस्थितीनुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल. पण सध्यातरी युतीबाबत कोणताही निर्णय झाला असेही आमदार नायकवाडी यांनी स्पष्ट केले आहे.

Sanjay Raut & Ajit Pawar
Local Body Election : एकछत्री कारभाऱ्यांचे पॉकेट तोडले, हक्काचे भाग जोडले, मात्ताबरांच्या 'या' प्रभागात राजकीय घमासान

FAQs :

प्र.1: इद्रिस नायकवाडी यांनी संजय राऊत यांना काय इशारा दिला?
उ.1: अजित पवारांवर खालच्या पातळीची टीका केल्यामुळे राऊत यांची जीभ हासडली जाईल, असा कठोर इशारा दिला.

प्र.2: या वक्तव्यामुळे काय परिणाम झाला?
उ.2: विधानसभेत आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला.

प्र.3: महायुतीतील युतीबाबत नायकवाडींचे मत काय आहे?
उ.3: अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, पण परिस्थितीनुसार स्वबळावर लढू शकतो असे त्यांनी म्हटले.

प्र.4: अजित पवार यांच्या समर्थनात नायकवाडी का आक्रमक झाले?
उ.4: कारण त्यांना वाटते की संजय राऊत यांनी पवारांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीची टीका केली.

प्र.5: स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर काय संकेत दिले गेले?
उ.5: महायुतीत युती न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याचा स्पष्ट इशारा नायकवाडी यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com