Sangli News : कर भरा अन् सोन्याची कर्णफुले मिळवा

Pay taxes and get golden earrings: सांगली मधील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
Sangli Kasbe Wangi
Sangli Kasbe WangiSarkarnama

Sangli News : नागरिकांनी अधिकाधिक मिळकत कर (Property Tax) भरावा आणि तिजोरीत मोठी रक्कम जमा व्हावी, यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. चालू आर्थिक वर्ष संपायला अजून तीन महिने अवकाश असला तरी प्रशासकीय कार्यालयांमध्ये कर वसुलीचे मोठे आव्हान उभे असते. कर वसुली झाली तरच विकासासाठी निधी उपलब्ध होतो. त्यावरच गावचा विकास अवलंबून असतो. अशा परिस्थितीत 100 टक्के वसुलीसाठी नामी शक्कल लढवली जाते.

अशीच काही योजना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कसबे वांगी या ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. मार्च 2024 अखेर मिळकतकराची थकबाकी पूर्णपणे भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला आहे. त्यातून तीन विजेत्यांना चक्क सोन्याची कर्णफुले बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत.

कडेगाव तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतपैकी कसबे वांगी ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून कर्जवसुलीचे मोठे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनासमोर असते. यंदाच्या वर्षी एकूण एक कोटी 4 लाख करवसुली असून, ती मार्च 2024 अखेरपर्यंत जमा करण्याचे आव्हान आहे. मात्र अनेकदा कितीही प्रयल केले तरी अवघी 40 टक्केच करवसुली होते.

गावात एकूण 3034 खातेदार, पण प्रत्येकजण थकबाकी भरली जातेच असे नाही. कर वसुलीसाठी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले, गाळे सील केले तरी काही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. कर भरण्यासाठी फार जबरदस्ती करायला लागू नये यासाठी आता ग्रामपंचायतीने बक्षिस देण्याची ही शक्कल लढविली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangli Kasbe Wangi
NDCC Bank News : "मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, 'त्या'अधिकाऱ्याला परत सेवेत घ्या!"

करवसुली सुवर्ण बक्षीस योजना

वांगी ग्रामपंचायतीने खातेदारांना लागु केली आहे. जे घरपट्टी, पाणीपट्टी पूर्णपणे भरणार आहेत. त्यांनाच या योजनेत समावेश होण्याचा लाभ मिळणार आहे. योजनेत एकूण तीन बक्षीसे ठेवली आहेत. पहिले बक्षिस पाच ग्रॅम सोन्याची कर्णफुले, तर दुसरे तीन ग्रॅम सुवर्ण कर्णफुले आणि तिसरे बक्षिस हे दोन ग्रॅम कर्णफुले असे आहे. या वर्षापासून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्या खातेदारांचा योजनेत समावेश होणार आहे. कर भरला की बक्षिस मिळत असल्याने किमान बक्षिस मिळविण्याच्या उद्देशाने तरी नागरिक कर भरतील, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मार्च 2024 पर्यत कर भरता येणार

या योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि कर्मचाऱ्यांना योजनेत भाग घेता येणार नाही. योजनेची शेवटची तारीख 11 मार्च 2024 पर्यत असणार आहे. यानंतर कर भरणाऱ्या खातेदारांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. तर योजनेत सहभागी झालेल्या खातेदारांना लकी ड्रॉ द्वारे या बक्षिसाचा लाभ मिळणार आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

Sangli Kasbe Wangi
Amol Kolhe: 'आपल्यालाच का टार्गेट केलं जातंय ?' कोल्हेंचा सवाल; मोदी, अजित पवार गटावरही केले गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com