Sangli Politics : भाजपला बंडखोरीचा धोका, तर कारभाऱ्यांना आरक्षणाचा फटका; सांगलीचं राजकारण आरक्षणानंतर फिरलं

Sangli Politics After Reservation : भाजप नेते तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधी भाजप कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल त्यानंतर उर्वरित पक्षांच्या जागेबाबात विचार केला जाईल, असं वक्तव्य केल्यामुळे आता युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेने एकटं लढण्याची चाचपणी अनेक मतदारसंघात सुरू केली आहे.
Sangli politics
BJP and Mahayuti leaders discussing Sangli Municipal election strategy after the reservation draw reshaped local politicsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 13 Nov : सांगली-कुपवाड-मिरज महानगरपालिकेत आरक्षण सोडतीनंतर बहुतांश जणांचे नियोजित राजकारण फिस्कटले आहे. महायुतीमधील भाजपसमोर इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी आव्हानांचा डोंगर पार करावा लागणार आहे. प्रसंगी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी असल्याने बंडखोरीची टांगती तलवार आहे.

मिरजमधील विद्यमान नगरसेवकांना ‘सेफ’ आरक्षण घोषीत झाले आहे. तर काही जणांचे पत्ते कट झाले आहेत. शहरातील मध्यवर्ती गावभागासह खणभाग, सांगलीवाडी, शामरावनगर, कारखाना परिसरात आरक्षणानंतर अनेक इच्छुकांचे मनसुबे उधळले आहेत. आरक्षणामुळे मातब्बरांना आपल्या कुटुंबातील महिलांना पुढे आणावे लागणार आहे.

सांगली महानगरपालिका महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट नाही. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अगोदर भाजप कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल मग त्यानंतर उर्वरित पक्षांच्या जागे संदर्भात विचार केला जाईल, असं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र चाचपणी अनेक मतदारसंघात केली आहे.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गट थोडा कमकुवत असला तरी त्याला बेदखल करण्यासारखी परिस्थिती नाही. शिवाय भाजपकडे काँग्रेसमधील मदन पाटील समर्थकांची उमेदवारीसाठी ‘भाऊ’गर्दी झाली आहे. त्यामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. उमेदवारी आपल्याला मिळेल की नाही यावरूनच पालकमंत्र्यांना टार्गेटवर ठेवले आहे.

Sangli politics
NCP Politics : राष्ट्रवादीची नवी यादी जाहीर; प्रवक्तेपदावरून डावललेल्या मिटकरींना पुन्हा बोलण्याचा अधिकार, ठोंबरेंना लांबच ठेवले

त्यांना उमेदवारी न मिळाल्‍यास अनेकांना पुन्हा काँग्रेस आघाडीची दारे ठोठावण्याची वेळ येऊ शकते. सर्व प्रभागांत लढत चुरशीची असेल, यात मात्र शंका नाही. त्यामुळे महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सवतासुभा पाहता दरी कायम राहणार की ‘सांधली’ जाणार हे पाहावे लागणार आहे. तर कदम यांच्या माध्यमातून जन सुराज्यही रिंगणात असू शकेल. भाजपसोबत ते समाधानकारक जागासाठी प्रयत्नशील असतील.

स्थानिक आघाड्यांची झालेल्या नोंदणीचा मुद्दाही चर्चेत आहे. मिरज पॅटर्नचा प्रयोग झाला तर महायुती आणि महाआघाडीसमोर आव्हान असेल. एकूणच मिरजेत धक्कादायक प्रयोग ऐन निवडणूक काळात होतील असे स्पष्ट संकेत आहेत. महापालिकेच्या प्रभागाची सुरूवात होणाऱ्या कुपवाडमधील प्रभागात माजी नगरसेवक शेडजी मोहिते, पद्मश्री पाटील, रईसा रंगरेज यांच्यासाठी अनुकूल आरक्षण घोषीत झाले आहे.

तर विजय घाडगे यांना सर्वसाधारणची संधी असणार आहे. या प्रभागातून सर्वाधिक इच्छूकांची संख्या पहावयास मिळते. पद्मश्री पाटील यांचे पती प्रशांत पाटील यांना थेट महापालिकेत जायची असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारणच्या एका जागेसाठी आपले वजन वापरावे लागणार आहे. कुपवाड शहराचा भाग असलेल्या प्रभाग आठमध्ये उमेदवारीसाठी विशेष चुरस पहावयास मिळणार आहे. या प्रभागातून सोनाली सागरे यांचा पत्ता कट झाला आहे.

Sangli politics
Bhaskar Jadhav : राजकारणात नवा ट्विस्ट! ठाकरेंच्या शिवसेना बैठकीनंतर भास्कर जाधवांचा मोर्चा भाजप नेत्याकडे वळाला, रत्नागिरीत खळबळ

या ठिकाणी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचेही आरक्षण घोषीत झाल्याने नव्या चेहऱ्याला संधी मिळणार आहे. निवडणूकीअगोदर अनेक इच्छूकांनी जेवणावळी, शिबीरांसह अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपले नाव चर्चेत आणले होते. मात्र, आजच्या आरक्षणामुळे यातील अनेकांचा हिरमोड झाला आहे. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून आपापल्या प्रभागात संपर्क वाढवून आगामी निवडणूकीची जोरदार तयारी करणाऱ्या मिरजेतील दिग्गजांना आरक्षण सोडतीमुळे धक्का बसला आहे.

महायुतीमध्ये अगोदरच असलेली इच्छूकांची वाढती संख्या, महाआघाडीनेही चालवलेली तयारी पाहता जून्याजाणत्यांना प्रभागातून लढताना दमछाक होणार आहे. आरक्षण सोडतीनंतर माजी महापौर संगीता खोत, योगेंद्र थोरात, पांडूरंग कोरे यांचा पत्ता कट झाला आहे किंवा त्यांना नवे मैदान शोधावे लागेल. तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महापालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर इच्छूकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली होती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com