

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीसाठी दापोलीत आलेले आमदार भास्कर जाधव यांनी बैठक संपल्यानंतर भाजप नेते सूर्यकांत दळवी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला.
मात्र, दळवी हे त्या वेळी चिपळूण येथील महायुतीच्या बैठकीसाठी रवाना झाल्याने दोघांची भेट होऊ शकली नाही.
ही ‘न झालेली भेट’ दिवसभर दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेचा प्रमुख विषय ठरली.
Ratnagiri News : नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून भापज, शिदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला वेग देण्यात आला आहे. अशातच खेड येथील खराब रस्त्याच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर जहरी टीका केली होती. तसेच भाजप नेते वैभव खेडेकर यांच्यानंतर दळवी यांनी देखील स्वबळाचा नारा दिला होता. या घडामोडींमुळे एकीकडे खेडमधील राजकीय वातावरण ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत तापण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दळवी यांची भेट घेण्यासाठी त्यांची घराकडे गाडी वळवल्याने एकच खळबळ उडाली. ज्याची दिवसभर जोरदार चर्चा सुरू झाली होती.
सध्या होवू घातलेल्या खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदासह जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाला असून वाद सुरू झाला आहे. अशातच भाजपनेदेखील जोरदार तयारी करत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करत भाजप कार्यालयाचा उद्घाटन सोहळा घेतला. तोच काल (ता.12) राज्यातील पहिला महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज खेड येथे दाखल करण्यात आला. शिवसेना पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. माधवी राजेश बुटाला यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामुळे येथील नगराध्यक्ष पदाचा वाद मिटल्याचे दिसत आहे.
दरम्यान कार्यालयाचा उद्घाटन सोहळ्यात दळवी यांनी, खेडमधील रस्त्यांच्या अवस्थेवरून शिवसेना नेते तथा मंत्री योगेश कदम यांना डिवचत कदम निवडून येवून मंत्री झाले तरीही खेडमधील रस्त्यांची अवस्था वाईटच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष इकडे येणार असल्यानेच एका रात्रीत रस्ते कसे चकाचक करण्यात आले. यामुळे एकदा जनतेनंच आता विचार करावा की खेड नागपरिषदेत बदल झाला तर काय होणार? अशी टीका केली होती. यानंतर येथील राजकीय वातावरण तंग झाले होते.
याचदरम्यान भास्कर जाधव यांनी त्यांच्या मुलावर होणाऱ्या आरोप आणि दाखल झालेल्या गुन्ह्यावरून पिता पूत्र कदमांवर जोरदार टीका करत पुन्हा एकदा डान्सबारचा मुद्द्याला हात घातला. तसेच त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. ज्यामुळे जिल्ह्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. अशातच त्यांनी दळवी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने नक्की भास्कर जाधव यांच्या डोक्यात कोणती खिचडी शिजतेय असा चर्चा सुरू झाली होती.
भास्कर जाधव यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. याच बैठकीत त्यांनी, दोन पक्षांना वगळता इतर कुणाशीही चर्चा करू नये, असा सल्ला दिला. मात्र बैठक आवरून त्यांनी थेट आपली गाडी दळवी यांच्या निवासस्थानाकडे वळवली. मात्र दळवी हे त्याचवेळी चिपळूण येथील महायुतीच्या बैठकीसाठी रवाना झाल्याने दोघांची प्रत्यक्ष भेट होवू शकली नाही.
तरीदेखील या ‘न झालेल्या’ भेटीच्या चर्चेचं खेडसह जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवून सोडले असून राजकीय चर्चांनी खळबळ उडालीय. तर या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दळवी म्हणाले, अतिथीदेवो भव ही आपली संस्कृती आहे. दापोलीत येणारे विविध पक्षांचे नेते भेटतात. आम्ही दोघेही आमच्या पक्षात सक्रिय आहोत. यात वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
1. भास्कर जाधव दापोलीत का आले होते?
ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक बैठकीसाठी दापोलीत आले होते.
2. त्यांनी कोणाच्या घरी भेट दिली?
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या निवासस्थानाकडे ते गेले होते.
3. दोघांची भेट झाली का?
नाही, कारण दळवी त्या वेळी चिपळूण येथे महायुतीच्या बैठकीसाठी गेले होते.
4. या भेटीबाबत काय चर्चा आहे?
ही भेट न झाल्यानेसुद्धा दोघांमधील संभाव्य राजकीय संवादावर चर्चा रंगली आहे.
5. या घटनेचे राजकीय महत्त्व काय आहे?
या घडामोडीमुळे उद्धव गट आणि भाजप यांच्यात नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता चर्चेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.