Vishal Patil : ऑफर देवून थकलेल्या भाजपने गेअर बदलला? खासदार विशाल पाटलांचा एक एक बुरूज पाडण्यास सुरूवात

BJP Warning to MP Vishal Patil : गेल्या काही दिवसांपासून सांगलीत भाजपकडून मोठ्या नेत्यांना गळ घातली जात आहे. तर काँग्रेसचे मोठे नेते फोडले जात आहे. अपक्ष खासदार विशाल पाटील यांना देखील अनेकदा पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे.
Vishal Patil
Vishal Patilsarkaranma
Published on
Updated on

Summary :

  1. जयश्री पाटीलनंतर काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

  2. हा निर्णय काँग्रेस व अपक्ष खासदार विशाल पाटील यांना मोठा राजकीय धक्का देणारा आहे.

  3. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा कार्यक्रम सांगलीतील राजकीय समीकरणे बदलू शकतो.

Sangli News : गेल्या काही दिवसांपासून सांगलीत भाजप आपला गड भक्कम करताना दिसत आहे. यासाठी काँग्रेससह शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील मोठे नेते आणि पदाधिकारी आपल्या सोबत घेतले जात आहेत. पक्षातूनच अपेक्षित सहकार्य, मदत मिळाली नसल्याचा दावा करत वसंतदादा यांच्या नात सून, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा तथा मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी काँग्रेस सोडली होती. त्यामुळे हा अपक्ष खासदार विशाल पाटील यांना धक्का मानला जात होता. अशात आता भाजपने पुन्हा डाव टाकत काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या पक्ष प्रवेशाची टाईमिंग साधली आहे. हा पक्ष प्रवेश 11 ऑगस्ट रोजी होणार असून या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यामुळे हा पक्ष प्रवेश देखील काँग्रेससह विशाल पाटील यांना झटका असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर विशाल पाटील यांना 'सोबत या अन्यथा तुमची टीम पोखरू असाच' इशारा भाजपकडून देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. (Manoj Sargar joins BJP in Sangli in presence of Ravindra Chavan, adding to Vishal Patil’s political woes after Jayashree Patil’s exit)

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सांगलीत काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. सध्या काँग्रेस कार्यकर्ते नाराज असून भाजप व जनसुराज्यसारख्या पक्षांकडे वळत आहेत. तर ही घसरण थोपवण्याची क्षमता अंगी असलेले नेतेही गटा-तटाच्या जोखंडात अडकलेले आहेत. त्यामुळे येथे काँग्रेसला लागलेली गळती काँग्रेसच्या नेत्यांना रोखता आलेले नाही. तर स्थानिकच्या आधीच काँग्रेसची अवस्था अधिकाधिक बिकट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Vishal Patil
Vishal Patil : खासदार विशाल पाटलांचा 'दणका'! भ्रष्टाचाराचा वास येताच अधिकाऱ्यांना दिला थेट इशारा!

पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे जवळ जवळ निश्‍चित केले असतानाच काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा पक्ष प्रवेश देखील होणार आहे. या पक्ष प्रवेशामुळे भाजपला सांगली शहरात धनगर समाजाचा चेहरा मिळाला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दरम्यान मनोज सरगर यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांचा गट अधिक भक्कम होण्यास मदत मिळणार आहे. सरगर यांनी विशाल पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचारासाठी सांगलीसह जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी असा भांगांत चांगली फिल्डिंग लावली होती. त्यांच्या लोकसंपर्काचा फायदा झाला होता. निधी वाटपात भूमिका न मिळाल्याने ते नाराज होते आणि गाडगीळ यांच्या संपर्कात गेले होते. याच संधीचा फायदा उचलत त्यांनी सरगर यांना भाजपमध्ये आणले आहे.

विशाल पाटील यांना इशारा

सरगर यांचा पक्ष प्रवेश हा भाजपसह आमदार गाडगीळ यांची ताकद वाढवणारा आहे. पण त्या पेक्षा अधिक हा प्रवेश अपक्ष खासदार विशाल पाटील यांना इशारा देणारा आहे. विशाल पाटील यांना भाजप नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकदा नाही तर चार चार वेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. मात्र विशाल पाटील यांनी आपण काँग्रेस विचारसरणीचे असल्याचे सांगत भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते.

त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत जयश्री पाटील यांना फोडले आता सरगर यांचा पक्ष प्रवेश होत आहे. तर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील वाटेवर आहेत. हे मोठे पक्ष प्रवेश असून हे तिनही चेहरे खासदार विशाल पाटील यांच्या जवळचे आहेत. यामुळे या प्रवेशावरून भाजपला विशाल पाटील यांना फक्त एक संदेश द्यायचा असून अप्रत्यक्ष पणे प्रवेश करा, अन्यथा रसद पुरवणारेच पक्षात घेऊ असे सांगितले आहे.

Vishal Patil
Vishal Patil : 'आमचं घर फोडलं, पण मी काँग्रेसचाच', विशाल पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

FAQs :

प्र.१: मनोज सरगर यांचा भाजप प्रवेश कधी आणि कुठे आहे?
उ: सांगलीत, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित.

प्र.२: हा प्रवेश काँग्रेससाठी का महत्त्वाचा धक्का आहे?
उ: काँग्रेसचे स्थानिक बळ कमजोर होईल आणि विशाल पाटील यांची राजकीय ताकद कमी होऊ शकते.

प्र.३: भाजपचा ‘सोबत या अन्यथा टीम पोखरू’ इशारा कोणाला उद्देशून आहे?
उ: अप्रत्यक्षपणे विशाल पाटील आणि त्यांच्या समर्थकांना.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com