
सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का देत जयंत पाटील यांचे विश्वासू अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डांगे यांनी कमळ हाती घेतले.
या घटनांमुळे सांगली जिल्ह्यातील आणि मविआच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Mumbai/Sangli News : राज्यात आगामीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्ष आणि नेते मंडळी मोर्चे बांधणीला लागेल असून बेरजेची गणितं आतापासूनच केली जात आहेत. अशातच सांगलीत भाजपने महाविकास आघाडीला दुसरा मोठा धक्का दिला आहे. याआधी जयश्री पाटील यांच्या हातात कमळ देत काँग्रेसला धक्का दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. जयंत पाटील यांचे जवळचे विश्वासू अण्णासाहेब डांगे यांनी घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती कमळ घेतले. यावेळी डांगे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. (Anna Saheb Dange’s defection from NCP sp to BJP is a major political blow to Jayant Patil and MVA ahead of Maharashtra 2025 elections)
ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे माजी मंत्री असून त्यांनी भाजपसोडल्यानंतर स्वत:चा पक्ष काढला होता. पण तो पुढे न आल्याने ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आले होते. पक्ष फुटीनंतरही ते शरद पवार यांच्याबरोबरच होते. पण आता मुंबईमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. अण्णासाहेब यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुलं चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत स्थानिकच्या तोंडावर जयंत पाटलांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सांगलीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं असल्याचं म्हटलं जात आहे.
जयंत पाटलांच्या राजकारणाचा पाया
इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक, सहकारच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्या राजकारणाचा पाया मजबूत झाला आहे. पण या संस्थांचे जाळे तयार करण्याचे काम अण्णासाहेब डांगे यांनी केले आहे. डांगे हे जनसंघाचे कार्यकर्ते असून आता ते भाजपमध्ये परतले आहे. त्यांचे अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (जि. अहमदनगर) येथील विकासात्मक चळवळीत योगदान आहे. तर ॲड. चिमण डांगे धनगर समाजाचे नेतृत्व करत आहेत. चिमण डांगे यांच्या भाजप प्रवेशाने इस्लामपूर मतदारसंघातील धनगर समाज आता भाजपकडे सरकला आहे. तर भाजपने डांगे यांच्या प्रवेशाने जयंत पाटील यांना धक्का देण्याचे काम केल्याची चर्चा सुरू आहे.
जयंत पाटलांचा सबुरीचा सल्ला मात्र...
दरम्यानच्या काळात ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे भाजपबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना जोर धरला होता. त्यावेळी आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा केली होती. तसेच याबाबत आपण एकत्रित विचार करू, असा सबुरीचा सल्लाही दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आम्ही पाळणार असल्याचे सांगत त्यांनी आज (30 जुलै) भाजपमध्ये प्रवेश केला.
1. अण्णासाहेब डांगे कोणत्या पक्षात होते आणि आता कुठे गेले?
ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे होते आणि आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
2. डांगे यांच्या भाजप प्रवेशाचे महत्त्व काय आहे?
ते जयंत पाटील यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू होते, त्यामुळे हा त्यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातो.
3. याचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होईल?
सांगलीसह राज्यातील भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीच्या गणितांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.