Sangola APMC News: सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; नेत्यांचा मेळ लागेना, मतदारांना काही कळेना!

Shivsena and NCP : नेत्यांनी केलेल्या युती-आघाडीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली
Shahaji Patil, Deepak Salunke Patil, BabaSaheb Deshmukh, Baburao Gaikwad
Shahaji Patil, Deepak Salunke Patil, BabaSaheb Deshmukh, Baburao GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Sangola Bazar Samiti News: सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी लक्षवेधक ठरत आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत आघाडी, युती तयार केल्या आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी या निवडणुकीमध्ये 'नेत्यांचा मेळ लागेना, मतदारांनाही काही कळेना!' अशीच अवस्था निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

Shahaji Patil, Deepak Salunke Patil, BabaSaheb Deshmukh, Baburao Gaikwad
Raj Thackeray On Politics : सध्या एकही पक्ष 'पार्टी विथ डिफरन्स' नाही; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

तालुक्यातील (Sangola) सहकारी सूतगिरणी व खरेदी विक्री संघाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यानंतर आता सर्वच पक्षांचे व प्रमुख नेत्यांचे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लक्ष लागले होते. या बाजार समितीची उलाढाल मोठी आहे. त्यामुळे समितीवर वर्चस्वासाठी सर्वांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

विधानसभेनंतर तालुक्यातील बदललेली राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील (Deepak Salunke Patil) यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत ही निवडणूक ताकतीने लढविणार असल्याचे सांगितले. तर सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने ही निवडणूक लढविण्याचे ठरवून तयारीला लागण्याचे आदेशही दिले होते.

Shahaji Patil, Deepak Salunke Patil, BabaSaheb Deshmukh, Baburao Gaikwad
Sharad Pawar : भाकरी ही फिरवावी लागते; आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे; पवारांचे मोठे विधान

नेत्यांनी केलेल्या वल्गणांमुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने विविध गटातून आपले उमेदवारी अर्ज भरले. अर्ज माघारी घेण्याच्या काही तास अगोदर तालुक्यातील प्रमुख पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी बिनविरोध करण्यासाठी आपली तयारी दर्शवली. त्या दृष्टीने शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी आपली युती केली.

Shahaji Patil, Deepak Salunke Patil, BabaSaheb Deshmukh, Baburao Gaikwad
Yashwantrao Gadakh : मुख्यमंत्री व्हायला आवडलं असतं, पण...; यशवंतराव गडाखांनी व्यक्त केली खंत !

पूर्वी नेत्यांनीच दिलेल्या आदेशमुळे अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेण्यास नकार दिला. त्यातच शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी आपले पॅनलच स्वतंत्रपणे बनवुन सत्ताधारी शेकापमध्ये जणू फूटच पाडली. या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांची साथ मिळाली. त्यामुळे त्यांच्या हातात आरपीआय, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेही (Shivsena) हात दिला.

पक्षापेक्षा नेत्यांच्या आघाड्या झाल्याचे या निवडणुकीत दिसून येऊ लागले आहे. सध्या प्रचार व गाठीभेटीचा जोर वाढला असला तरी या नव्या युती, आघाडींमुळे कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shahaji Patil, Deepak Salunke Patil, BabaSaheb Deshmukh, Baburao Gaikwad
Raj Thackeray Interview : राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच केलं कौतुक अन् दिला 'हा' सल्ला

पक्षांपेक्षा नेत्यांचीच युती अन् आघाडी

एकीकडे सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे पाटील यांच्याशी युती केली. ते पॅनेल तयार करून निवडणूक लढवीत आहेत. दुसरीकडे शेकापचेच जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी स्व. गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव गायकवाड यांनी साथ दिली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी परिवर्तन आघाडीसोबत असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. झपके हे सत्ताधारी आघाडीत असल्याचे दिसत आहेत. आरपीआय व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना परिवर्तन आघाडीत सामील झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षापेक्षा नेत्यांचीच आघाडी व युती झाल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com