"माझ्या राजकीय जीवनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायला नक्कीच आवडले असते. मात्र, या पदाचा मुकूट मिळण्यास योग जुळून आला नाही. माझ्या आयुष्यात खासदार, आमदार होण्याचा योग होता आणि तो मला मिळाला. ही बाब देखील माझ्यासाठी मोठी आहे", असं माजी खासदार व जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटलं.
काही विद्यार्थ्यांनी गडाख यांची आमराई विश्रामगृह येथे भेट घेत त्यांची मुलाखत घेतली. यावेळी एका विद्यार्थ्याने त्यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडले असते का?, असा प्रश्न विचारला असता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री होण्यास आवडले असते. पण योग जुळून आला नाही, असं उत्तर दिलं.
"प्राथमिक शेतीशाळेत शिक्षण घेताना राणे गुरुजी यांनी पाच झाडे लावून ते जतन करण्याचे सांगितले होते. त्यामुळे वृक्षलागवड आणि वृक्ष संवर्धनाचे खरे बीज तेथे रोवल्यामुळे मी माझ्या आयुष्यात हा उपक्रम यशस्वी करु शकलो", असंही ते यावेळी म्हणाले.
तसेच नगर कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी पदाची निवडणूक जिंकलो आणि तेथून नेतृत्वगुण विकसित झाल्याचे गडाख यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितले. दहा रुपायांसाठी एका दुकानदाराच्या दारात दोन तास बसून राहिलो होतो, अशी बालपणाची आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.
"पर्यटनस्थळांच्या भेटीने आयुष्य आनंदी तर पुस्तक वाचनाने ज्ञानात भर पडते, असं सांगत कौतुकी नदीच्या वाळूतील आठवणी, आई, पत्नी आणि बहिण यांनी दिलेली साथ माझ्या यशाचा अपुर्व ठेवा आहे", असंही ते यावेळी म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.