Manisha kayande- Hedgewar-Savarkar
Manisha kayande- Hedgewar-Savarkar Sarkarnama

Thackeray Group Reaction : कर्नाटक सरकारने सावरकर, हेडगेवार यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळले; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यवीर सावकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत, त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही.

मुंबई : कर्नाटक सरकारने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यासह इतर काही जणांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळले आहेत. कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या या निर्णयाचा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी निषेध केला आहे. (Karnataka govt drops Savarkar, Hedgewar lessons from textbooks: Thackeray faction's first reaction)

कर्नाटकमधील (Karnataka) काँग्रेस सरकारच्या (Congress) मंत्रिमंडळाने इयत्ता सहावी ते दहावीच्या कन्नड आणि समाजशास्त्र या विषयांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याचा निर्णयास मंजुरी दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्यासह इतर काही जणांवरील पाठ्यपुस्तकातील धडे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला आहे.

Manisha kayande- Hedgewar-Savarkar
Solapur News : चिमणी पाडल्यानंतर काडादींना नाना पटोलेंचा फोन; ‘त्यांनी कारखान्याची चिमणी पाडली; आपण त्यांना पाडू’

याबाबत आमदार कायंदे म्हणाल्या की, कर्नाटक सरकारचा आम्ही निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा अनेकदा याबाबत स्पष्ट वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. सावरकर हे सर्वांसाठी आदर्श असं व्यक्तीमत्व आहे. स्वातंत्र्यलढ्यातील सावरकर यांचे योगदान आणि बलिदान हे खूप मोठं आहे. त्यामुळे असं पाठ्यपुस्तकातून त्यांचा धडा काढून टाकणं अत्यंत निषेधार्ह आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.

Manisha kayande- Hedgewar-Savarkar
YSR Congress News: खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण; पोलिसांनी अवघ्या काही तासांतच केली सुटका..

हेडगेवार यांच्याबद्दलही असाच प्रकार केला असेल तर तेही निषेधार्ह आहे. शाळेतील पुस्तकातून धडा काढून टाकल्यामुळे कोणी लहान होत नाही. पण हे करण्यामागचं कारण काय आहे. नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, त्यामुळे कर्नाटक सरकारने घेतलेल्या निणर्याचा आम्ही निषेधच करतो, असेही मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com