Dharmraj Kadadi On Chimney : चिमणी वाचविण्यासाठी गेलेल्या काडादींना मुख्यमंत्री म्हणाले,‘ माझे हात बांधले गेले आहेत...’

हा नगरविकास खात्याच्या अखत्यारित निर्णय होता, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे अपिल केलं होतं.
Dharmraj Kadadi
Dharmraj KadadiSarkarnama

Siddheshwar Sugar Factory Chimney : श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी वाचविण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. हे प्रकरण उच्च न्यायालयात असलं तरी तुम्ही तुमच्या अधिकारात या पाडकामाला स्थगिती देऊ शकता, अशी विनंती केली. मात्र, हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्याने मला त्यावर स्थगिती देता येणार नाही. तो ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ होईल, त्यामुळे माझे हात बांधले गेले आहेत, असे धोरण मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतले, असे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी आज सांगितले. (Dharmraj Kadadi meet Chief Minister Eknath Shinde to save Siddheshwar factory chimney)

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar factory) ९२ मीटर उंचीची चिमणी गुरुवारी (ता. १५ जून) सोलापूर (Solapur) महापलिकेने कटरच्या साहाय्याने पाडण्यात आली. त्यानंतर धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी चिमणी वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

Dharmraj Kadadi
Solapur News : चिमणी पाडल्यानंतर काडादींना नाना पटोलेंचा फोन; ‘त्यांनी कारखान्याची चिमणी पाडली; आपण त्यांना पाडू’

काडादी म्हणाले की, कारखान्याची चिमणी वाचविण्यासाठी मी स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटलो. पवार यांनी कोणाला फोन करायचे ते केले. तसेच, मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. चिमणीचे पाडकाम थांबविण्याची त्यांनाही विनंती केली होती. मी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडेही अपिल केलं होतं. कारण, या ठिकाणी एयरपोर्ट ॲथोरेटीचा प्रश्न नव्हता. महापालिकेचा बांधकाम परवाना नव्हता; म्हणून ही चिमणी पाडण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

Dharmraj Kadadi
YSR Congress News: खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण; पोलिसांनी अवघ्या काही तासांतच केली सुटका..

महापालिकेसंबंधीचा निर्णय हा नगरविकास खात्याच्या अखत्यारित होता, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे अपिल केलं होतं. मात्र, तिथं तो मूव्ह होत नाही म्हटल्यानंतर आम्ही हे प्रकरण घेऊन उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी वीस जून ही तारीख दिली होती. उच्च न्यायालयातही स्टे मिळाला नाही, असे काडादी यांनी स्पष्ट केले.

Dharmraj Kadadi
Sahkar Shiromani Election : सहकार शिरोमणी काळेंकडेच राहणार की अभिजीत पाटील बाजी मारणार? सभासद उद्या करणार फैसला...

काडादी यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात आम्हाला दिलासा न मिळाल्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणाले की, हे प्रकरण उच्च न्यायलयात असलं तरी तुम्ही तुमच्या अधिकारात ‘स्टे’ देऊ शकता. आपण बीजीसीची मिटिंग होईपर्यंत थांबा. त्यात जो काही निर्णय होईल, तो आम्ही मान्य करायला तयार आहोत. पण, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. त्यामुळे मला त्यावर स्टे देता येणार नाही. तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, त्यामुळे माझे हात बांधले गेले आहेत, असे धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं.

Dharmraj Kadadi
Hitendra Thakur News : 'अप्पा, तुमच्या वसई-विरारमध्येही शासन आपल्या दारी येणार'; नव्या सरकारमधील हितेंद्र ठाकुरांचे महत्व मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित

फडणवीसांना भेटायचा प्रयत्न केला;पण...

मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या संदर्भात भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी माझी भेट होऊ शकली नाही, असेही काडादी यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com