BJP Politics : भाजपकडून काहीही अपेक्षा नाहीत! प्रवेश केलेल्या माजी आमदाराची पुढची तयारी सुरू...

Sanjay Ghatge’s Campaign Plans and Key Focus Areas : नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात संजय घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये स्वार्थासाठी पक्षप्रवेश केलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
Sanjay Ghatge
Sanjay GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रोज एका नेत्याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे. कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजपमध्ये पक्ष केला खरा, पण पक्षाकडून कोणत्याच अपेक्षा ठेवल्या नाहीत.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये स्वार्थासाठी पक्षप्रवेश केलेला नाही. भाजपकडे कोणतेही पद मागितलेले नाही आणि दिले तरी घेणारही नाही. एकदा घेतलेल्या निर्णयाशी मी प्रामाणिक राहतो, अशा शब्दांत घाटगे यांनी भूमिका मांडली आहे.

Sanjay Ghatge
Uddhav Thackrey Politics : तुम्हीच राजसाहेबांना मातोश्रीचे निमंत्रण द्या! उद्धव ठाकरेंना नेत्यांची कळकळीची विनंती...

दरम्यान, सद्य परिस्थिती पाहता कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात भाजपकडे नेतृत्व नाही. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणूक होताच माजी आमदार घाटगे यांनी संधी साधत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

सध्यातरी भाजपकडून त्यांनी अपेक्षा ठेवली नसली तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांच्या राजकीय जोडण्यांसाठी पुढील काळ फायदेशीर होऊ शकतो. याच मतदारसंघातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक हे देखील जिल्हा परिषद मतदारसंघातून आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sanjay Ghatge
Ashwini Bidre Case : अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मोठी बातमी; अभय कुरुंदकरला जन्मठेप, फळणीकर, भंडारी सुटणार

महायुती म्हणून एकत्र निवडणूक झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. उमेदवारीची गोची निर्माण होऊ शकते. मात्र स्वतंत्र निवडणूक झाल्यास सोयीस्कररीत्या भाजप अंबरीश घाटगे त्यांच्यावतीने निवडणुकीच्या रिंगणात राहू शकतो. मात्र आतापासूनच आग्रह धरला तर निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून प्रश्न सुटतीलच असे नाही. आतापासूनच माजी आमदार घाटगे यांनी पुढच्या जोडण्या लावायला सुरुवात केली आहे.

मुश्रीफ गटाला बाय?

माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर हा मुश्रीफ यांना सोपा पेपर समजला जातो. कारण समरजीत घाटगे यांची पुन्हा एकदा घरवापसीची चर्चा सुरू झाली होती. मात्र माजी आमदार संजय घाटगे यांचा प्रवेश झाल्याने मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधातील धार आणखी कमी झाली आहे. शिवाय माजी आमदार घाटगे यांच्या भाजप प्रवेशामध्ये मुश्रीफ यांचाच हात असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com