Kolhapur Lok Sabha Constituency : शाहू महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत; मंडलिकांच्या विधानाने खळबळ

Sanjay Mandlik Vs Shahu Chhatrapati : मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार?
Chhatrapati Shahu Maharaj, Sanjay Mandlik
Chhatrapati Shahu Maharaj, Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती हे यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे Kolhapur आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान मंडलिकांनी केले आहे. हे वृत्त सर्वप्रथम 'साम' वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केले होते. मंडलिकांच्या या वक्तव्याने कोल्हापुरातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. Sanjay Mandlik targets Shahu Chhatrapati at Chandgad.

चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार मंडलिक Sanjay Mandlik बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही-आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पूरोगामी विचार जपला आहे. आखाड्यात उतरल्यावर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? असे म्हणत मंडलिकांनी काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

लोकसभेचा आखाडा जसा जवळ येईल तसा कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मंडलिकांनी शाहू छत्रपती Shahu Chhatrapati यांच्यावर टीकेची मोहीमच उघडलेली दिसून येत आहे. यापूर्वीही तुमचा राजहट्ट कोल्हापुरची जनता पुरवणार नाही, असा निशाणा साधला होता. कोल्हापूरच्या गादीवर ज्या पद्धतीने आले तसा राजहट्ट या लोकसभेच्या निवडणुकीतही आहे. पण सगळे राजहट्ट कोल्हापूरची जनता पुरवणार नाही. कुस्तीच्या आखाड्यात ज्या पद्धतीने डाव टाकले जातात, टांग मारली पाहिजे, अंगावर माती टाकली पाहिजे त्या पद्धतीनेच सर्व काही होणार, असे म्हणत मंडलिकांनी शाहू छत्रपतींना लक्ष्य केले होते.

Chhatrapati Shahu Maharaj, Sanjay Mandlik
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसमधून आलेल्या शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजप नेत्यांचा कसून प्रचार...

मंडलिकांनी काँग्रेस नेते माजी मंत्री सतेज पाटलांचाही Satej Patil समाचार घेतला होता. 2026 पर्यंत संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा विकास करेल असे पाटील म्हणाले होते. मग आताच त्यांना मी चुकीचा कसा वाटायला लागलो? तुम्हालाच निवडणुकीला उभे राहायला लागणार म्हटल्यानंतर तुम्ही राजकीय बळी शोधला आणि शाहू महाराजांना गळ घातली, असा टोलाही लगावला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Chhatrapati Shahu Maharaj, Sanjay Mandlik
Lok Sabha Election 2024 : धनगर समाज नाराज, सुनेत्रा पवारांच्या मतदानावर परिणाम होणार? स्टेटसवर निषेध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com