संजय पाटलांची ख्याती योगी आदित्यनाथ यांच्या पर्यंत..केंद्रीय मंत्र्याने केले कौतुक

Sanjay Patil : खासदार संजय पाटील यांनी अनंत अडचणी यापूर्वी पार केल्या आहेत.
MP Sanjay Patil Latest News
MP Sanjay Patil Latest News Sarkarnama

कुरळप : सांगली जिल्ह्यात भाजपचे (BJP) वर्चस्व निर्माण करण्यात खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांचे मोठे योगदान आहे. यापुढेही आपण तशाच पद्धतीने कार्यरत राहा अन् जिल्हा भाजपमय करा, असे आवाहन केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल (Satyapal Singh Baghel) यांनी केले. शिराळा तालुक्यातील श्री गोरक्षनाथ देवस्थानाला त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. (MP Sanjay Patil Latest News)

MP Sanjay Patil Latest News
'सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली', मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला..

बघेल म्हणाले, खासदार पाटील यांनी अनंत अडचणी यापूर्वी पार केल्या आहेत. स्वतःच्या ताकदीवर आणि विकासकामांच्या जोरावर त्यांनी स्वतःची ताकद निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर लढवय्ये व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत ख्याती आहे. देशाला नरेंद्र मोदींच्या रुपाने एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्यांना पोहोचवण्याची आवश्यकता आहे. यासह शिराळा व वाळवा तालुक्यांतून आलेल्या उपस्थितांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. विविध जनहिताच्या निर्णयाने भाजपने देशात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. यापुढे सर्वांनीच आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने कसे जिंकतील, याकडे लक्ष द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.

MP Sanjay Patil Latest News
भाजपने 6300 कोटी खर्च करून 277 आमदार खरेदी केले; केजरीवालांचा गंभीर आरोप

शिराळा तालुक्यातील गोरक्षनाथ मंदिर परिसर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून याठिकाणी शासनाच्या विविध योजनांतून विकास व्हावा,असेही मत त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मठाधिपती पीरपारसनाथ यांच्या तब्येतीची राज्यमंत्रांनी आस्थेने विचारपूस केली. यावेळी मठाधिपती पीरपारसनाथ यांनी पूर्वीचे अनेक दाखले देत श्री गोरक्षनाथ यांच्या अनेक आख्यायिका त्यांना सांगितल्या.

याचवेळी बघेल यांनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व स्वतःच्या नातेसंबंधाबाबत अनेक उदाहरणे उपस्थितांना सांगितली. यावेळी मठाधिपती पीरपारसनाथ यांनी राज्यमंत्री बघेल यांचे स्वागत केले. शिराळ्याच्या वतीने स्वप्निल निकम, संतोष हिरुगडे, सुशांत पाटील, धनाजी मोरे, सदाशिव कुंभार, कृष्णा कुंभार यांनी स्वागत केले. यावेळी आमदार गोपीनाथ पडळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, आनंदनाथ महाराज आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com