चंद्रकांतदादांनी वेटिंगवर ठेवलेल्या 'संजयकाकांचा' भाजप प्रवेश फिक्स : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे संकेत

Sangli BJP Politics : गेल्या काही दिवसांपासून सांगलीत भाजपने आपले स्थान पक्के केले असून जिल्ह्यात मोठा भाऊ होण्याकडे देखील वाटचाल सुरू ठेवली आहे. आता भाजपमध्ये मोठा पक्ष प्रवेश होत असून बहुप्रतिक्षित पक्ष प्रवेशाचे देखील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे संकेत दिले आहेत.
Sanjay Patil Chandrakant Patil And Ravindra Chavan
Sanjay Patil Chandrakant Patil And Ravindra Chavansarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजपमध्ये पुनःप्रवेशावर पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत.

  2. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या प्रवेशाला नकार दिला, तर रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

  3. या घडामोडींमुळे महाराष्ट्र भाजपच्या अंतर्गत राजकारणावर लक्ष केंद्रीत झाले आहे.

Sangli News : सध्या सांगलीत मोठे पक्ष प्रवेश होताना दिसत असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांच्या डिनर डिप्लोमेसीची सध्या चर्चा होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रवेश केलेल्या जयश्री पाटील यांचा विरोध असणाऱ्या काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशावर चव्हाण यांनी शिक्कामोर्तब केला आहे. बुधवारी हा पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान चव्हाण यांनी दादांनी वेटिंगवर ठेवलेल्या 'संजयकाकांचा' भाजप प्रवेशही फिक्स केल्याची चर्चा सुरू आहे. (Sanjay Patil’s BJP re-entry supported by Ravindra Chavan while Chandrakant Patil objects in Maharashtra political tussle)

यावेळी चव्हाण यांनी, पतंप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य असणारे आणि राष्ट्रहिताच्या विचाराने येणाऱ्या प्रत्येकाचे भाजपमध्ये स्वागत होईल. त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. तसेच यांनी सांगली दौऱ्यात पत्रकरांशी संवाद साधला, यावेळी चव्हाण म्हणाले, भाजपचे संघटन पर्व आता अंतीम टप्प्यात आले आहे. पक्षात येणाऱ्या नवीन नेते, कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जात आहे. जुन्या कार्यकर्त्यांनाही विविध पदांवर संधी दिली जात आहे. काही ठिकाणी वाद आहेत. मात्र पक्षाच्या निर्णयानंतर कोणी वेगळा विचार करत नाहीत.

Sanjay Patil Chandrakant Patil And Ravindra Chavan
Sangli Politics : भाजप प्रदेशाध्यक्षांचं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या घरी स्नेहभोजन : जेवताना पक्षप्रवेशाचा मुहूर्तही काढला

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबाबत ते म्हणाले, पतंप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी असलेल्या व आमचे राष्ट्रीयत्व मान्य असेल त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात मजबूत सरकार काम करत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जनतेची कामे करण्याच्या उद्देशाने विविध पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना महायुतीत येण्याची इच्छा असणे स्वाभविक आहे.

खासदार विशाल पाटील यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपमध्ये येण्याचे आवाहन करत आहेत यावर बोलताना ते म्हणाले, चंद्रकांत पाटील हे चांगले काम करणाऱ्याला पक्षात येण्यासाठी ते प्रयत्न करतात. सांगलीला मंत्रीपदाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, भाजप बॅकलॉग भरायचा म्हणून कोणाला मंत्री करत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्र्यांची निवड केली आहे. सर्व मंत्री चांगले काम करत आहेत. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे वरीष्ठ मंत्री आणि नेते आहेत त्यांनी सांगलीसाठी भरपूर काम केले आहे. त्यामुळे एक सक्षम मंत्री या जिल्ह्यात आहे.

संजय पाटील यांच्याबाबत सकारात्मक

भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्या पुन्हा भाजपमध्ये प्रवेशाबाबत विचारले असता रविंद्र चव्हाण म्हणाले, संजयकाका मध्यंतरीत वेगळ्या पक्षात गेले. आता ते पुन्हा भाजपमध्ये येऊ इच्छितात, त्यांच्या प्रवेशाबाबत पक्ष सकारात्मक आहे.

न बोलताच चंद्रकांतदादा बोलून गेले...

दरम्यान संजयकाका हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. तिथेच त्यांचे पुनर्वसन केलं पाहिजे. ते आमचे जुने नेते व मित्र असल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षातच पुनर्वसन करण्यासाठी आम्ही अजित पवारांना विनंती करू, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळेच संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनांच पूर्णविराम लागल्याचे बोलले जात होते.

एकीकडे गेल्या दिवसांपासून प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या संजयकाकांना भाजपची दारे बंद असल्याचे न बोलताच सर्वकाही चंद्रकांत पाटील बोलून गेले. तर दुसरीकडे त्यांनी विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर आपण देतच राहू असेही म्हणाले होते. त्यामुळे संजयकाका काहीसे नाराज झाले होते. मात्र आता संजयकाका यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्ष सकारात्मक असल्याचा दावा केल्याने माजी खासदार संजय पाटील पुन्हा एकदा भाजपवासी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sanjay Patil Chandrakant Patil And Ravindra Chavan
Ravindra Chavan: 'संविधान बचाव'ची 'शो'बाजी करणारे...; PM मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना रविंद्र चव्हाणांचं उत्तर

FAQs :

प्र.१: संजय पाटील कोणत्या पक्षातून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत?
उ: ते दुसऱ्या पक्षातून परत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

प्र.२: त्यांच्या प्रवेशावर पक्षात मतभेद का झाले?
उ: चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला तर रवींद्र चव्हाण यांनी समर्थन दिले.

प्र.३: या प्रकरणाचा महाराष्ट्र भाजपवर काय परिणाम होऊ शकतो?
उ: पक्षातील गटबाजी आणि शक्ती समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com