Kolhapur Local government elections : राऊतांचा स्वबळाचा नारा, पण कोल्हापूरला वाली कोण?

Sanjay Raut On Local Government Elections : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्यासंदर्भात एकला चलोची भूमीका घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीत राजकीय भूकंप आला आहे.
Local Government Elections
Local Government ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पक्षाचं जे होईल ते होऊ द्या, पण आता कार्यकर्त्यांना संधी द्यायलाच पाहिजे. त्यांना संधी न मिळाल्याने पक्ष वाढीला फटका बसतो, अशी भावना राऊत यांनी व्यक्त केली. यामुळे महाविकास आघाडीत आता राजकीय भूकंप आला असून मविआ आता एकसंघ राहणार की तिन्ही पक्ष वेगळे होणार यावर राजकीय चर्चांना उत आला आहे.

राऊत यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले वक्तव्य महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बळ मिळाले. पण विधानसभा निवडणुकीत आघाडीचा दारून पराभव झाला. यामुळे सर्वच पक्षांना पक्ष टिकवण्याची चिंता लागली. अशातच कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे चेहरा कोणता? अशी विचारण्याची वेळ आता शिवसेनेवर आली आहे.

Local Government Elections
Local Self Government Elections : स्थानिक गट टिकवण्याची नेत्यांची परीक्षा; सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा नारळ फुटणार

एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याने सहा आमदार आणि दोन खासदार शिवसेनेला दिले होते. मात्र पक्ष फुटीनंतर पक्षाला चेहरा मिळत नसल्याची दयनीय अवस्था बनली आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांची आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लाडल्यानंतर शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेला एका अपक्षासहित तीन आमदारांचे बळ मिळाले. ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेले नेतृत्वाची कमतरता, निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून दिलेली आयत्या उमेदवारांना संधी, राजकीय सोयीनुसार स्थानिक नेत्यांनी केलेले तह याचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला.

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंची शिवसेना अस्तित्व शिल्लक ठेवण्यासाठी रोज एका विषयाला घेऊन रस्त्यावर उतरली आहे. सामाजिक प्रश्नांची किनार असली तरी त्याला सामाजिक स्वरूप न देता केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी आंदोलने केली जात आहेत. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या माध्यमातून तयारी असल्याचे स्थानिक नेते खुलेआम पणे सांगत आहेत.

एकीकडे इतर पक्षांच्या नेत्यांच्या दावणीला पक्षाला बांधण्याचे आरोप निष्ठावंत शिवसैनिकांकडून होत आहेत. तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात पक्ष पिच्छाडीवर राहिल्याचा आरोप आता केला जात आहे. यामुळे स्थानिक पदाधिकारी निकालानंतर टीकेचे धनी ठरले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सक्षम चेहरा शोधण्याची वेळ आता निष्ठावंत शिवसैनिकांपुढे आली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेली स्वबळाची घोषणा ही कोल्हापूर जिल्ह्यात कितपत यशस्वी ठरणार? हे निवडणुकीनंतरच कळेल.

Local Government Elections
Local Self-Government News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आशेने इच्छुक कंगाल, वर्गणी देऊन झोळी झाली रिकामी !

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले. पण विधानसभा निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागले. वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यावर आम्हाला निश्चितपणे स्वबळावर लढावे लागेल. आम्ही निवडणूक लढवू त्यात यशस्वी देखील होऊ. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे. अशी प्रतिक्रिया सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com