
Beed, 12 March 2025: देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आज बीड जिल्ह्यातील केजच्या कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे. देशमुख हत्येतील आरोपींनी कोर्टात हजर करण्यात येणार होते. पण सर्व आरोपींनी सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीव्दारे कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.
देशमुख कुटुंबातील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.
या प्रकरणात नेमण्यात आलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रकृती अस्वस्थामुळे उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्याचे सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे कामकाज पाहणार आहेत. आरोपींच्या वतीने त्यांचे वकील काही अर्ज कोर्टात दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
संतोष देशमुख हत्येचा पोलीस, सीआयडीची पथके तपास करीत आहेत. खंडणीसाठीच देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे तपासात उघड झाले आहे. देशमुख यांची हत्या झाली तेव्हाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.