Pankaja Munde: सुरेश धसांनी डिवचल्यानंतर पंकजाताईं पहिल्यांदाच बोलल्या; फडणवीस, बावनकुळेंकडून व्यक्त केली 'ही; अपेक्षा

Suresh Dhas Vs Pankaja Munde: सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली, असा सवाल पंकजाताईंनी धसांना केला आहे. धसांना पक्षश्रेष्ठींनी समज का दिली नाही, असा थेट सवाल पंकजाताईंनी पक्षश्रेष्ठींना केला आहे.
Suresh Dhas Vs Pankaja Munde
Suresh Dhas Vs Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed, 12 March 2025: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. भाजपच्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सुरेश धसांनी निशाणा साधला होता. 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली, असा सवाल पंकजाताईंनी धसांना केला आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज का दिली नाही, असा थेट सवाल पंकजाताईंनी पक्षश्रेष्ठींना केला आहे.

सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिले पाहिजे, असा जाब पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना विचारला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Suresh Dhas Vs Pankaja Munde
Navi Mumbai: एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध; 14 गावांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धस यांनी माझ्यावर थेट आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना 'समज' द्यावी, असे मुंडे म्हणाल्या.

सुरेश धसांनी ज्यावेळी पंकजाताईंवर टीका केली होती तेव्हा त्यावर उत्तर देणं त्यांनी टाळलं होते. त्यांना वारंवार या प्रश्नावर विचारलं असता 'धसांच्या प्रश्नांना उत्तर मी देणार नाही' असे त्यांनी स्पष्ट केले. धस यांच्या कृतीवर मात्र त्यांनी बोट ठेवत पंकजाताईंनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

(येत्या शनिवारी 'सरकारनामा'च्या अंकात पंकजा मुंडे यांची सविस्तर मुलाखत वाचा)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com