Satara BJP Agitation against Jitendra Awhad : 'धिक्कार असो.. धिक्कार असो... जितेंद्र आव्हाडांचा धिक्कार असो, जितेंद्र आव्हाडांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, निम का पत्ता कडवा है, जितेंद्र आव्हाड ....है, भारतीय जनता पार्टीचा विजय अस.'', अशी घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी पोवई नाका येथे एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांचे छायाचित्र असणारे पोस्टर फाडल्याबद्दल त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली. जितेंद्र आव्हाडांच्या(Jitendra Awhad) या कृतीमुळे ते चांगलेच अडचणी येणार असल्याचे दिसत आहे. शिवाय महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनीही आव्हाडांना यावरून चांगलेच कोंडीत पकडण्याचे काम सुरू केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान केल्याबद्दल भाजप(BJP) सातारा जिल्हा, सातारा शहर यांच्यावतीने साताऱ्यात गुरुवारी आंदोलन झाले. पोवई नाका येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देतानाच त्यांच्या प्रतिमेस जोडे मारले. आव्हाडांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान केल्याबद्दल त्यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(ShivendraRaje Bhosale) म्हणाले, 'ज्यांनी देशाची घटना लिहिली. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत देशात अखंडता राखण्यात मोठे योगदान दिले आहे.अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचे पाप आव्हाड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोक स्वत:ला पुरोगामी समजत असताना त्यांच्या हातून अशी घटना घडणे योग्य नाही. यातूनच आज त्यांचा खरा चेहरा पुढे आला आहे.'
याशिवाय 'ते ज्येष्ठ नेते असून त्यांच्याकडून असे काम होऊन समाजात वेगळा संदेश देण्याचे काम झाले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. डॉ.आंबेडकर यांच्यासारखा महान नेता आपल्या देशात होऊन गेला. त्यांनी लिहिलेल्या संविधानाने सर्वसामान्य लोकांना अधिकार मिळवून दिला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई शासनाने करावी.' असंही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी म्हटलं.
यावेळी यावेळी मुलुंडचे नगरसेवक विनोद कांबळे,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे,सुनील काळेकर,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे,सचिन भोसले,रवी आपटे प्रवीण शहाणे,प्रदेश महिला मोर्चा चिटणीस सुनीशा शहा,वैशाली टंकसाळे,कुंजा खंदारे,संगीता जाधव, रोहिणी क्षीरसागर,अश्विनी हुबळीकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.