Jitendra Awhad News : सुषमा अंधारेंची आव्हाड यांच्या समर्थनार्थ पोस्ट, म्हणाल्या 'सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते' !

Sushma Andhare Asked Questions to BJP Office Bearers and Leaders : बाबासाहेबांबद्दल वेगळा प्रेमाचा उमाळा दाखवणाऱ्या तमाम छुपे आणि उघड भाजप समर्थकांनी हे स्पष्ट करावे की मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात समावेशन होत असताना तुम्ही कोणत्या बिळात लपला होतात ?
Sushma Andhare- Jitendra Awhad
Sushma Andhare- Jitendra AwhadSarkarnama

Sushma Andhare News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यासमोर झालेल्या आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली.

या घटनेच्या निषेधार्थ भाजपकडून आव्हाड यांना धारेधर धरले जात असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. महायुतीला विविध मुद्यांवरून कोंडीत पकडणारे आव्हाड या प्रकरणामुळे भाजपच्या तावडीत सापडल्याने याचा फायदा घेत त्यांच्याविरोधात आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यााचा विचार भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर रणनिती ठरविली जात आहे.

महाड येथे आपल्या हातून चुकून घडलेल्या या प्रकाराबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने जाहीर माफी देखील मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी मागितलेल्या माफीवर भाजपचे समाधान न झाल्याने आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार भाजप नेत्यांनी केला आहे. आमदार आव्हाड यांच्यावर कारवाई न झाल्यास त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराच पुणे भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

आव्हाड यांच्या विरोधात महायुतीत सहभागी असलेल्या राजकीय पक्षांनी रान उठविले असताना महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाने आव्हाड यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आव्हाड यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट केली आहे. आव्हाडांवर टीकेची झोड उठविणाऱ्या भाजपच्या नेत्यांना देखील अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करत जाब विचारला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare- Jitendra Awhad
Jitendra Awhad News: मोठी बातमी! महाडमधील आंदोलन भोवणार ? जितेंद्र आव्हाडांसह 24 जणांविरोधात गुन्हा दाखल

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणतात, सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. कारण मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलन सर्वांनाच ज्ञात आहे.

शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राची (Maharashtra) जाहीर माफी देखील मागितली आहे. पण तरीही याच्या आडून राजकारण करणाऱ्या आणि बाबासाहेबांबद्दल वेगळे प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांसाठी एक सवाल आहे.

बाबासाहेबांनी मांडलेला प्रत्येक विचार जर शिरोधार्य असेल तर त्याच बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. कारण मनुष्यमात्राला असमान मानणारा विचार हा मानवी कल्याणाचा विचार असू शकत नाही असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर आव्हाड ज्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होते यावर तुमचं मत काय आहे? असा सवाल देखील अंधारे यांनी आंदोलन करणाऱ्यांना विचारला आहे.

बाबासाहेबांबद्दल वेगळा प्रेमाचा उमाळा दाखवणाऱ्या तमाम छुपे आणि उघड भाजप (BJP) समर्थकांनी हे स्पष्ट करावे की मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात समावेशन होत असताना तुम्ही कोणत्या बिळात लपला होतात ?

त्यासाठी तुम्ही थेटपणे शिक्षण खात्याच्या संबंधित मंत्र्यांना जाहीर प्रश्न कधी विचारले आहेत त्याचा विरोध करायचा म्हणून शिक्षण खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही कधी मागणार आहात? बाबासाहेबांचा अपमान जेव्हा भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी केला त्या वेळेला आत्ताचे भाजपचे छुपे आणि उघड समर्थक हे चंद्रकांत पाटलांच्या बद्दल मूग गिळून गप्प का बसले होते?

Sushma Andhare- Jitendra Awhad
Eknath Shinde News : लोकसभेच्या निकालावर मुख्यमंत्र्यांचे मोठं भाकीत; 'महाराष्ट्रात आघाडी...'

बाबासाहेबांबद्दल खरंच प्रेमाचे उमाळे येत असतील तर इंदू मिलच्या जागेवर कुदळ मारायला आलेले मोदीजी अजून तिथे विटही रचली गेली नाही. यावर हे छुपे आणि उघड समर्थक मोदींना थेटपणे जाब विचारत मोदींना सत्तेतून पायउतार करण्याची भाषा करतील का?

जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळले गेले तेव्हा ती प्रत जळणाऱ्या आरएसएस समर्थकांच्या विरोधात आत्ताचे भाजपचे छुपे किंवा उघड समर्थक रस्त्यावर का उतरले नाहीत? बाबासाहेब यांच्या प्रत्येक कृतीबद्दल जर अभिमान असेल तर मग भीमा कोरेगाव मध्ये झालेले हिंसाचाराला कारणीभूत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या बद्दल थेट भूमिका या छुपे किंवा उघड समर्थकांनी का घेतली नाही ?

या प्रश्नांची उत्तर तुम्ही देऊ शकत नाही कारण तुमचा बौद्धिक हलकटपणा चळवळीत काम करणारे सच्चे कार्यकर्ते अभ्यासक आणि लढवय्ये चळवळे लोक जाणून आहेत. असेही सुषमा अंधारे यांनी आव्हाड यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com