Zadani Land Case : 'झाडाणी' प्रकरणात तीन ठिकाणी कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन!

Shambhuraj Desai News : गुजरातच्या जीएसटी आयुक्तांसह 13 जणांनी अल्पदरात जमीन खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून कारवाईचे दिले आदेश
Zadani Land Case
Zadani Land Casesarkarnama
Published on
Updated on

Satara Zadani News : झाडाणी प्रकरणी आलेल्या चौकशी अहवालात तीन ठिकाणी कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झाले असून तीन बांधकामे दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त केलेली आहेत. त्यामुळे या अहवालानुसार संबंधित जमीन मालकांना नोटीस पाठविली जाणार आहे. दरम्यान, नियमापेक्षा जास्त असलेल्या जमिनीवर कारवाई करावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

कांदाटी खोऱ्यातील झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथे गुजरातच्या जीएसटी आयुक्तांसह 13 जणांनी अल्पदरात जमीन खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची वाई प्रांताधिकाऱ्यांमार्फत महाबळेश्वर तहसीलदार यांनी चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Zadani Land Case
620 Acres Land Purchase : गुजरातमधील अधिकाऱ्याने बळकावलं महाराष्ट्रातील गाव, साताऱ्यात घेतली 620 एकर जमीन?

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे निवेदन वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी मुंबईत एकनाथ शिंदे(Eknah Shinde) यांना दिले होते. त्यावरुन सोमवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच नियमाबाह्य असलेल्या सर्व बाबींवर कारवाई करण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

वाईचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात 13 जणांनी ही जागा खरेदी केल्याचे नमूद असून यामध्ये तिघांकडून कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Zadani Land Case
Shambhuraj desai On Dhangekar : पुरावे न देता धंगेकरांची स्टंटबाजी; त्यांनी पुरावा द्यावा...शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर !

तसेच तीन ठिकाणी दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अहवालानुसार जिल्हाधिकारी संबंधितांना नोटीस पाठविणार आहेत. त्यानंतर त्यावर सुनावणी होणार आहे. या प्रकरणात गुजरातचे जीएसटी आयुक्तांचा सहभाग असल्याने हे प्रकरण अधिकच पेटले आहे.

चार पाच नव्हे तर तब्बल 620 एकर जमीन गुजरातमध्ये जीएसीटीचे मुख्य आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील दुर्गम कांदाटी खोऱ्यात घेतल्याची माहिती माहिती अधिकारातून पुढे आली आहे. या संदर्भात माहिती अधिकारी कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

नंदूरबारचा रहिवाशी असलेले आणि सध्या अहमदाबाद, गुजरात येथे जीएसटी GST मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कंदाटीतील 640 एकर जमीन बळकावल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनातील कारवाई करण्याची मागणी देखील मोरे यांनी केली आहे. गुजरातच्या  जीएसीटी आयुक्तांनी, त्याच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी असे एकूण 13 जणांनी झाडाणी (ता.महाबळेश्वर) हे संपूर्ण गावचं खरेदी केले आहे. यातून तेथील 620 एकराचा भूखंड बळकावला आहे , असे देखील मोरे यांनी म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com