Chitra Wagh -Satyajeet Patankar-jaykumar Gore-Ganesh Naik-Shambhuraj Desai
Chitra Wagh -Satyajeet Patankar-jaykumar Gore-Ganesh Naik-Shambhuraj DesaiSarkarnama

Satara Politic's : गोरे, नाईक, वाघ, पाटणकरांना शंभूराज देसाई एकटे पुरून उरले; पाटणमध्ये केवळ ‘शंभूराज’च!

Zilla Parishad Result : सातारा जिल्हा परिषद व पाटण पंचायत समिती निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी सातपैकी सहा जागा जिंकून भाजपचा पराभव करत विकासाच्या जोरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
Published on

Karad, 10 February : सातारा जिल्हा परिषद आणि पाटण पंचायत समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला सलग दुसऱ्यावेळी प्रत्यक्षात उतरवून भाजपला धोबीपछाड दिला आहे. भाजपने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार चित्रा वाघ यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. मात्र, पालकमंत्री देसाई यांनी एकाकी झुंज देऊन विकास कामांच्या जोरावर पाटणमध्ये केवळ 'शंभूराज'च असल्याचे दाखवून दिले.

सातारा जिल्हा परिषदेच्या सातपैकी सहा जागा जिंकून पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी इतिहास रचत भाजपला चारीमुंड्या चीत केले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर या पिता-पुत्रांना म्हावशी गट आणि गणाच्या एका जागेवर मतदारांनी रोखले.

सातारा जिल्हा परिषद आणि पाटण पंचायत समितीसाठी पालकमंत्री शंभुराज देसाई आणि भाजपचे (BJP) पाटणचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

विधानसभा निवडणुकीत ढासळलेल्या पाटणकर यांच्या गोकूळ तर्फ हेळवाक गटात पालकमंत्र्यांच्या शिवसेनेचे मोठ्या फरकाने तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. कोयना, केरा व वनकुसवडे पठारावर देसाई गटाकडे गेला. तारळे गटातही गट व गणाचे तीनही उमेदवार मोठ्या फरकाने बालेकिल्ल्याला शोभेल, असा कौल पालकमंत्र्यांना दिला.

Chitra Wagh -Satyajeet Patankar-jaykumar Gore-Ganesh Naik-Shambhuraj Desai
Rohit Pawar : वेळेत न आलेला बडा नेता, विदर्भातील नेत्याचा सहीचा हट्ट अन् मंत्रालयात राहिलेली ती फाईल : अजितदादांनी बदलला गाडीचा प्लॅन

कोयनेत सपाटून मार खालेल्या भाजपला म्हावशी गट व गणाने तारले. या ठिकाणी दोन्ही उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत. मात्र, चाफळ गणात पालकमंत्री देसाईंनी दोन निवडणुकीत काठावर फसवलेल्या या गणात दीड हजाराहून अधिक मतांची आघाडी घेत सत्तांतर घडवले.

पाटणच्या गोकूळ तर्फ हेळवाक गटात व चाफळ गणात मिळालेला विजय सत्तांतर घडवून गेला. तारळ्याप्रमाणे मल्हारपेठ, मारूल हवेली गटात मंत्री देसाईंचे अभेद्य बुरूज नावाप्रमाणे अभेद्य राहिले. पाटण पंचायत समितीत शिवसेनेला १३, तर भाजपला अवघी एक जागा मिळाली. भाजपने मोठी तयारी करुन पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या नियोजनाने भाजपचा मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम झाला.

Chitra Wagh -Satyajeet Patankar-jaykumar Gore-Ganesh Naik-Shambhuraj Desai
Rohit Pawar News: अजितदादांचा अपघात नव्हे, घातच..! रोहित पवारांचे महाराष्ट्राचं राजकारण हादरवणारे ते सर्वात मोठे 10 दावे कोणते?

भाजप नेत्यांच्या सौभाग्यवतींचा पराभव

लक्षणीय लढती ढेबेवाडी विभागातील दोन्ही गटांत होत्या. भाजप नेते भरत पाटील आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवतींचा अनुक्रमे काळगाव व मंद्रुळ कोळे गटातून नवख्या उमेदवारांनी पराभव केला. भाजपचे नेते हिंदुराव पाटील यांच्या मुलालाही मंडळकोळे गणात व माजी उपसभापती रमेश मोरेंना कुंभारगाव गणात पराभव पत्करावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com