Ajaykumar Mishra : सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही; आता भाजप ताकतीने उतरलाय : अजयकुमार मिश्रा

Satara Collector office केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
Sharad Pawar, Ajaykumar Mishtra
Sharad Pawar, Ajaykumar Mishtrasarkarnama
Published on
Updated on

Satara BJP News : भारतीय जनता पक्ष BJP सातारा जिल्ह्यात ताकतीने उतरला आहे. जिल्ह्यात पक्षाला चांगले वातावरण असून आगामी काळात लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकू. त्यामुळे सातारा हा राष्ट्रवादीचा NCP बालेकिल्ला होता, आता राहिलेला नाही, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा Ajaykumar Mishtra यांनी केली आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale, भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

मिश्रा म्हणाले, सध्या भाजपला सातारा जिल्ह्यात चांगले वातावरण असून आमचा पक्ष ताकतीने उरला आहे. आगामी काळात लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. त्यामुळे सातारा आता राष्ट्रवादीचा NCP बालेकिल्ला राहिलेला नाही.

Sharad Pawar, Ajaykumar Mishtra
Ashish Mishra : ४ शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात आशिष मिश्राला जामीन : मात्र 'या' अटी ही घातल्या!

राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रवादीत कोणी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण, कोण कधी राजीनामा देतंय, राजीनामा परत घेतला जातो. काही लोक रडतात, हे सर्व प्रकार होत राहतात. यातील खरं काय हे मलाही माहिती नाही. पण, लोकांना वाटते की हे सर्व ठरवून केले जात आहे.

Sharad Pawar, Ajaykumar Mishtra
Satara BJP : उदयनराजेंना लवकरच मोठी जबाबदारी देणार... अजयकुमार मिश्रा

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील Maharashtra सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या नेत्यांवर सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, भाजपचे नेते दोषी कमी प्रमाणात ठरत आहेत. झालेल्या प्रकरणांची चौकशी होऊन शिक्षा होते. आपल्याकडे लोकशाही आहे, न्यायालये आहेत, चौकशी होऊनच न्यायालय निर्णय देते.

Sharad Pawar, Ajaykumar Mishtra
Sharad Pawar : पवारांचा 'Silver Oak' बंगला आतून दिसतो कसा ; पाहा खास फोटो!

मोदींना वाढता विरोधाबाबत ते म्हणाले, ममता बॅनर्जींंनी सर्व विरोधीपक्ष एका व्यासपीठावर आणले होते. केवळ मोदींना विरोध करण्यासाठी. आता भाजप व मोदींना हटविण्यासाठी विरोधकांची आघाडी होत आहे. पण, त्यांच्या विरोधातून भाजपची ताकद वाढत आहे.

Sharad Pawar, Ajaykumar Mishtra
Sharad Pawar Retirement : फटाके उडवून जल्लोष | Pune | NCP | Politics | Sarkarnama | #shorts

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com