Karad News : कराडमध्ये शेतकरी संघटना आक्रमक ; केंद्र सरकारच्या धोरणांची होळी..

Aggressive farmers association : आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप करत बेमुदत आंदोलनाचा इशारा..
Holi of central government policies
Holi of central government policiesSarkarnama
Published on
Updated on

Karad News : केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्यास बंदी घातली आहे. साखर, कांदा निर्यात बंदी केली आहे, खाद्य तेल मोठ्या प्रमाणात आयात केले आहे. यामुळे देशातला शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. याला केंद्र सरकारची आयात व निर्यात धोरण कारणीभूत आहेत.

हे निर्णय डिसेंबरअखेर मागे न घेतल्यास सर्व शेतकरी संघटनेसह हजारो शेतकऱ्यांसोबत नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीतील जंतर-मंतर येथे सरकारच्या विरोधात तीव्र बेमुदत आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनांच्यावतीने आज कराड Karad येथे केंद्र सरकारला देण्यात आला.

Holi of central government policies
Bacchu Kadu warned the Insurance Companies : बच्चू कडू सरकारवर नाराज?, दिला थेट इशारा

बळीराजा संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हाध्यक्ष बीआरएस पार्टीचे विश्वास जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे समीर देसाई, बळीराजा संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष गणेश शेवाळे आदींच्यावतीने केंद्र सरकारच्या धोऱणांचीही होळी यावेळी संघटनांच्यावतीने करण्यात आली.

पंजाबराव पाटील म्हणाले, सरकारने इथेनॉल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला थोडाफार दिलासा मिळाला. इथेनॉल बंद निर्णयामुळे आणि साखर व कांदा निर्यात बंदीमुळे साखर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे देशांतर्गत सोयाबीन व तेलबिया पिकवणारा शेतकरी योग्य भाव मिळत नसल्यामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. या सर्व संकटाला आपल्या केंद्र सरकारची आयात व निर्यात धोरण कारणीभूत आहेत. केंद्र सरकारने घेतलेले सर्व निर्णय शेतकरी विरोधी आहेत.

Holi of central government policies
Crops Insurance Politics : पीक विमा अग्रीमवरून बीडमध्ये श्रेयवाद ठिणगी..; शेतकरी मात्र मदतीच्या प्रतिक्षेतच

हे सर्व निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावे, इथेनॉल बनवण्यास साखर कारखान्याला परवानगी द्यावी, साखर व कांदा निर्यातीस तात्काळ परवानगी द्यावी, आयात केलेल्या खाद्यतेलावर ५० टक्के आयात शुल्क लावून देशातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे निर्णय डिसेंबर अखेर मागे न घेतल्यास आम्ही आमच्या विभागातील सर्व शेतकरी संघटनेसह हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली येथे जंतर-मंतर या ठिकाणी सरकारच्या विरोधात तीव्र बेमुदत आंदोलन करू. यावेळी देवानंद पाटील, विश्वास जाधव, गणेश शेवाळे, समीर देसाई यांनीही मनोगत व्यक्त करुन सरकारच्या धोऱणाचा निषेध केला.

( Edited by Amol Sutar )

Holi of central government policies
Satara News : ..संजय राऊत आलेत का ? ठाकरेंनी उडवली मनसे स्टाईलमध्ये खिल्ली..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com