Satara Politics : शशिकांत शिंदेंना एका मताने पाडणारा नेता आता पत्नीसाठी मैदानात : राष्ट्रवादीला पुन्हा धडकी

Javli Panchayat Samiti election : सातारा जिल्हा परिषद व जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षणानुसार कुसुंबी गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या गटातील कुसुंबी गणही सर्वसाधारण महिलेसाठी आणि आंबेघर तर्फ मेढा गण इतर मागास प्रवर्ग पुरुषासाठी आरक्षित झाला.
Satara ZP election, Shashikant Shinde
Archana Ranjane and Anuradha Kadam’s active campaigning in Kusumbi reflects the growing political intensity ahead of the Satara ZP elections, with Shashikant Shinde’s influence still evident in the region.Sarkarnama
Published on
Updated on

Satara News, 25 Oct : सातारा जिल्हा परिषद व जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षणानुसार कुसुंबी गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या गटातील कुसुंबी गणही सर्वसाधारण महिलेसाठी आणि आंबेघर तर्फ मेढा गण इतर मागास प्रवर्ग पुरुषासाठी आरक्षित झाला.

अशा स्‍थितीत सार्वजनिक बांधकाममंत्री आणि जावळी तालुक्‍याचे आमदार म्‍हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वरचष्‍मा असलेल्‍या या गट-गणांसाठी शिवसेना राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील नेत्‍यांनीही उमेदवारीसाठी मोठी उत्‍सुकता दाखवली आहे. त्यामुळे या गटातील सत्ताकारणासाठी राज्‍यातील महायुतीत सहभागी असलेल्‍या पक्षांमध्‍येच रस्‍सीखेच होणार हे उघड आहे.

भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषदेच्‍या माजी सदस्या अर्चना रांजणे यांचा मार्ग खुला दिसत आहे. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांच्या पत्नी शीतल कदम, शिवसेनेकडून संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या पत्नी कविता ओंबळे, पण या ठिकाणी महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आले, तर निवडणूक एकतर्फी होणार आहे.

तालुक्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्याकडून एक गट व दोन गणांची मागणी असून, ही मागणी मान्य न केल्यास विरोधक म्हणून हेच पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्याचवेळी शशिकांत शिंदे यांच्या गटाकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आतिष कदम यांच्या पत्नी अनुराधा कदम यांचीही नावे चर्चेत आहेत.

महाविकास आघाडी म्हणून विरोधकांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अमित कदम यांच्‍यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार असून, हे एकत्र आल्यास निवडणूक रंगतदार होणार आहे.

तर पुन्हा रांजणे विरुद्ध शिंदे लढत होणार?

सातारा जिल्हा बँकेत शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव केल्यानंतर ज्ञानदेव रांजणे चर्चेत आले होते. आता त्यांच्याच पत्नी, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍या अर्चना रांजणे या कुसुंबी गटातून लढणार असल्याची चर्चा आहे.

याशिवाय त्यांच्याकडे कुणबी दाखला असल्याने त्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच, समाजमाध्‍यमांवर त्‍यांच्‍याविषयीचे बॅनर्स, पोस्‍ट व्‍हायरल झाल्‍या होत्‍या. त्यामुळे या गटात पुन्हा शशिकांत शिंदे विरुद्ध रांजणे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

Satara ZP election, Shashikant Shinde
Karad Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीने रिप्लाय दिला नाही..., अख्खा पक्षच भाजपच्या गळाला, प्रवेशाचा मुहूर्तही ठरला

अंकुश कदम यांची भूमिका

जावळीचे सुपुत्र व नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले अंकुश कदम यांचे गाव मालचौंडी कुसुंबी गटात येते. महायुती म्हणून निवडणुका एकत्र न लढवल्यास शिवसेना पक्षातर्फे या गटात व गणात उमेदवार देऊन निवडणूक ताकदीने लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

कुसुंबी गटातील आंबेघर तर्फ मेढा गणात इतर मागास प्रवर्गातील पुरुषाचे आरक्षण असल्‍याने, येथे भाजपकडून सागर धनावडे, सुनील जांभळे, सचिन पार्टे हे कुणबी दाखल्यावर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, तर ओबीसी उमेदवार म्हणून केळघरचे माजी सरपंच रवींद्र सल्लक, राजेंद्र गाडवे, नारायण जाधव अशी इच्छुकांची मोठी गर्दी आहे.

म्हातेमुरा येथील गणपत ढेबे यांनी डोंगर माथ्यावरील सर्व लोक घेऊन थेट शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेऊन उमेदवाराची मागणी केली आहे, तर इतर पक्षातून एकनाथ ओंबळे स्वत: इच्छुक असून, शशिकांत शिंदे यांच्याकडून केळघरचे संकेत पाटील इच्छुक आहेत. या ठिकाणी केळघर गावचे सुपुत्र आणि माजी सभापती बापूराव पार्टे व त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

इच्‍छुकांची भाऊगर्दी कुसुंबी गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्‍याने, मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे इच्छुकांची गर्दी आहे. कुसुंबीचे सरपंच मारुती चिकणे यांच्या पत्नी प्रिया चिकणे, रूपाली शेलार, लक्ष्मी चिकणे, बामणोली विभागातून आपटीचे उद्योजक प्रमोद कदम यांच्या पत्नी लक्ष्मी कदम यांची नावे चर्चेत आहेत.

Satara ZP election, Shashikant Shinde
Satara Congress : काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बदलूनही सूर जुळेना..., माजी मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेल्या बड्या नेत्याचा रामराम

विरोधकांची एकी, निवडणूक चुरशीची...

कुसुंबी गटात शिवसेनेतर्फे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख अंकुश कदम, एकनाथ ओंबळे यांची चांगली ताकद असून, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साधू चिकणे या मित्र पक्षांना मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सोबत घेतल्यास निवडणूक एकदम सोपी जाईल, तर महायुतीत खडा पडल्यास माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, अमित कदम, शशिकांत शिंदे, अंकुश कदम, एकनाथ ओंबळे यांची एकी झाल्यास निवडणूक चुरशीची होणार आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे हे पत्नी वैशाली चिकणे यांना या ठिकाणी मैदानात उतरवणार असून, अंकुश कदम हेही दक्षिण जावळीला आतापर्यंत दुर्लक्षित केल्याचा मुद्दा धरत उमेदवार देणार आहेत. शशिकांत शिंदे यांच्या गटातर्फे करंडीचे विलास दुंदळे यांच्या पत्नी सुनीता दुंदळे संभाव्य उमेदवार असणार आहेत. अमित कदम यांचे समर्थक रवी शेलार यांनी अंधारी, कासच्या विद्यमान सरपंच सुरेखा शेलार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सांगवीच्‍या ग्रामपंचायत सदस्या अर्चना पवार या देखील ऐनवेळी मैदानात उतरू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com