Lok Sabha Election : महाविकास आघाडीचे जागावाटप होण्यापूर्वीच साताऱ्यातील नेत्यांचा मोठा निर्णय; राज्यभरात चर्चा

Lok Sabha Election Satara Constituency Maha Vikas Aghadi Meeting : राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप घोषित झालेले नाही. साताऱ्यात मात्र त्यापूर्वीच ठरलं...
Satara Lok Sabha Election
Satara Lok Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात आजा महाविकास आघाडीची मोठी बैठक झाली. सातारा लोकसभा मतदारसंघासह आगामी सर्वच निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढाव्यात, असा एक सूर आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत निघाला. महाविकास आघाडीचा राज्य स्तरावर अद्याप जागावाटप झाले नसताना त्यापूर्वीच साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाची राज्यभरात चर्चा होत आहे.

Satara Lok Sabha Election
Karad Vidhansabha : कराड 'दक्षिणे'त निधीवरून काॅंग्रेस अन् भाजपमध्ये कॉम्पिटिशन

सातारा लोकसभा मतदारसंघावरून एकीकडे महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची आज साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, दीपक पवार काँग्रेसचे डॉ. सुरेश जाधव, विजयराव कणसे, नरेश देसाई, शिवसेनेचे हर्षल कदम, सचिन मोहिते आदी उपस्थित होते.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सध्या महायुतीत वाद पेटला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर भाजपने जय्यत तयार केली आहे. तर अजित पवार गटानेही आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीतील हा जागा वाटपाचा पेच सातारा लोकसभेच्या मुद्द्यावर अडखळणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची मोट अधिक घट्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज सातारा जिल्हा राष्ट्रवादी भावनात महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसह सर्वच निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याची तयारी दर्शवली. आता या संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल. तसे झाल्यास सातारा लोकसभा मतदारसंघातील लढत महायुतीला जड जाण्याची शक्यता आहे.

Edited by sachin fulpagare

Satara Lok Sabha Election
BJP Vs Congress : सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना साताऱ्यात फिरू देणार नाही; भाजप आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com