Shahu Maharaj Net Worth : अबब! शाहू महाराज लईच 'श्रीमंत', तब्बल 300 कोटींचे मालक

Kolhapur Lok Sabha Election 2024 : शाहू महाराज यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या विवरण पत्रात संपत्तीची माहिती दिली आहे.
Shahu Maharaj
Shahu MaharajSarkarnama

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा निवडणूक (Kolhapur Lok Sabha Election 2024) अत्यंत चुरशीची बनली आहे. महायुतीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना संधी दिली आहे. सोमवारी शक्तिप्रदर्शन करत मंडलिकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर मंगळवारी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shahu Chhatrapati) यांचा उमेदवार अर्ज भव्य शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला. त्यातच आता शाहू महाराज यांची संपत्ती समोर आली असून, ते जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत.

उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या विवरण पत्रात शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी स्थावर आणि जंगम मालमत्ता, सोने, दागिने, गुंतवणूक, वाहन यांची माहिती दिली आहे. त्यानुसार शाहू महाराज यांच्या नावे 297 कोटी 38 लाख 8 हजार रुपयांची संपत्ती आहे. मागील महिन्यात शाहू महाराज यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहितीही विवरण पत्रात देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थावर आणि जंगम मालमत्ता

शाहू महाराज यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावावर 41 कोटी 6 लाखांची संपत्ती आहे. शाहू महाराज यांच्यावर कुठलेही कर्ज नाही. शाहू छत्रपती यांची 146 कोटी 64 लाख 49 हजार रुपयांची जंगम आणि 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 17 कोटी 35 लाखांची जंगम आणि 23 कोटी 71 लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

Shahu Maharaj
Sanjay Mandlik News : "थेट वंशज असल्याचं सिद्ध करा, तरच...", मंडलिकांनी विरोधकांना ठणकावलं

वाहने आणि जमीन

शाहू महाराज यांच्या नावावर 122 कोटी 88 लाख 59 हजार रुपये किमतीची शेतजमीन आहे. राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथील घर आणि न्यू पॅलेसची इमारत शाहू महाराज यांच्या नावावर आहेत. शाहू महाराज यांच्याकडे असणाऱ्या वाहनांची किंमत जवळपास 6 कोटी इतकी आहे. जगात केवळ दोन जुन्या पद्धतीची मेबॅक कार आहे. त्यातील एक शाहू महाराज यांच्याकडे आहे, तर मर्सिडीज बेंझच्या तीन कार, एक इनोव्हा आणि एक महिंद्रा थार शाहू महाराज यांच्याकडे आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

Shahu Maharaj
Kolhapur Lok Sabha 2024: अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी फेरविचार करावा, मुश्रीफांनी पुन्हा डिवचले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com