Satara Loksabha : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Loksabha Election 2024 : ...पण अखेर शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर सातारा लोकसभेला शिंदे आणि उदयनराजे यांच्यात थेट लढत होणार आहे.
Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Udayanraje Bhosale, Shashikant ShindeSarkarnama

Satara Loksabha News : आगामी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.मात्र,सत्ताधारी महायुतीसह विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीतही काही जागांवरुन दावे प्रतिदावे केले जात आहे. त्यामुळे काही जागांचं भिजत घोंगडं राहिलं होतं. त्यात सातारा लोकसभेचाही समावेश होता. या ठिकाणासाठी अनेक खल झाल्यावर अखेर शरद पवारांनी तिथे शशिकांत शिंदेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आता शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच प्रतिस्पर्धी उदयनराजेंविषयी मोठं विधान केलं आहे.

विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी ऐनवेळी तब्येतीचे कारण देत यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. यामुळे सातारा लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षासमोर नवा पेच निर्माण झाला होता. यात सातारा लोकसभा निवडणुकीसाठी रोज नवे नाव समोर येऊ लागल्याने या जागेबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला होता.पण अखेर शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर सातारा लोकसभेला शिंदे आणि उदयनराजे यांच्यात थेट लढत होणार आहे.

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Mahavikas Aghadi News : लोकशाहीसाठी मतदारांना साद घालणाऱ्या 'मविआ'च्या नेत्यांना मात्र स्वतःचीच चिंता!

आता शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देतानाच प्रतिस्पर्धी भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, सातारा लोकसभेत उमेदवारी देत माझ्या गुरूने परत एकदा शिष्यावर विश्वास दाखवला आहे. पाचवेळा आमदार केले, मंत्री केले आणि आता सातारामधून लोकसभेची उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांचा हा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी सातारा लोकसभेत राष्ट्रवादीचा,शरद पवारांच्या विचारांचा नक्कीच विजय होणार आहे. दोन्ही राजे समोर असले तरी माझ्याबरोबर सातारची जनता असल्याचा दावा त्यांनी केला.

...म्हणून माथाडी कामगार मलाच साथ देतील!

यावेळी शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान केलं. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील भाजपात असले तरी माथाडी कामगार माझ्यावर विश्वास ठेवून मला दिल्लीत पाठवतील. सातारच्या जनतेला माहीत आहे. सभागृहात आवाज उठवून साताऱ्यासाठी कोण प्रकल्प घेऊन येणार, त्यामुळे माझा विजय पक्का आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली. यामध्ये साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले  यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे अशी चुरशीची लढत होणार आहे. येत्या 15 एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शशिकांत शिंदे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे BJP राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. आता त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे सुरु केले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजेंच्या विरोधात तुल्यबळ व तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु होत्या. आज अखेर शरद पवारांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव आहे. आजच्या यादीत सातारा व रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार घोषित केले आहेत.

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Imtiaz Jalil News : 'आम्हीच जिंकू' असा इम्तियाज जलील यांचा दावा, मात्र यंदा पंतगाला हवा कुणाची?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com