सातारा पालिका : महिला उमेदवार निवडताना दोन्ही आघाड्यांचा कस लागणार...

सातारा पालिकेच्‍या Satara Muncipalty राजकारणात Politics ओबीसी OBC व इतर मागास प्रवर्गातील नेत्‍यांचे नेहमी वर्चस्‍व राहिले आहे.
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : सातारा पालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत बहुतांश हेवीवेट ओबीसी नेत्‍यांचे प्रभाग खुले झाले आहेत. त्‍यामुळे त्‍यांना आता खुल्‍या प्रवर्गातून शड्डू ठोकावा लागणार आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांचा प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला असून माजी नगराध्‍यक्ष निशांत पाटील यांचा प्रभाग महिला राखीव झाल्‍यामुळे या दोघांना पर्याय शोधावा लागणार आहे. निवडणुकीत सर्वच प्रवर्गातील महिला उमेदवारांची निवड करताना दोन्‍ही राजांच्या आघाड्यांचा कस लागणार आहे.

सातारा पालिकेच्‍या २५ प्रभागांची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. यानुसार पन्नासपैकी अनुसूचित जमातीच्‍या महिलेसाठी १, अनुसूचित जातीच्‍या महिलांसाठी व पुरुषांसाठी प्रत्‍येकी ३, तर खुल्‍या गटातील महिलांसाठी २१ आणि २२ जागा सर्वांसाठी खुल्‍या राहिल्‍या आहेत. सातारा पालिकेच्‍या राजकारणात ओबीसी व इतर मागास प्रवर्गातील नेत्‍यांचे नेहमी वर्चस्‍व राहिले आहे. यावेळी पहिल्‍यांदा इतर मागास आरक्षणाशिवाय पालिकेची निवडणूक होत आहे. त्‍यामुळे या नेत्‍यांचे हक्काचे प्रभाग राहिलेले नाहीत.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
फलटण पालिका : आरक्षणाने केली दिग्गजांची गोची, तर महिलांना संधी...

त्‍यामध्‍ये माजी नगराध्‍यक्ष अशोक मोने, माजी उपनगराध्‍यक्ष ॲड. दत्ता बनकर, राजू भोसले, मनोज शेंडे, रवी ढोणे, सीता हादगे यांचा प्रामुख्‍याने सहभाग आहे. या सर्वांनी आजवरच्‍या पालिकेच्‍या निवडणुकांमध्ये आपापले वर्चस्‍व दाखवून दिले आहे; परंतु यांचे प्रभाग खुले झाल्‍याने या नेत्‍यांना आता खुल्‍या प्रवर्गातून उमेदवारी मिळविण्‍यासाठी नेत्‍यांची मर्जी संपादन करावी लागणार आहे. त्‍यासाठी त्‍यांना त्‍या त्‍या प्रभागातून खुल्‍या गटातील कार्यकर्त्यांबरोबर उमेदवारी मिळवण्‍यासाठी स्‍पर्धा करावी लागणार आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
माझी वसुंधरा पुरस्कारात कराड पालिका राज्यात दुसरी

प्रभाग क्रमांक १३ मधील एक जागा अनुसूचित जातीच्‍या महिलेसाठी, तर एक जागा खुल्या गटासाठी आरक्षित झाली आहे. या परिसरात सध्‍या बाळासाहेब खंदारे प्रतिनिधित्व करत होते. महिला आरक्षणामुळे त्‍यांची गोची झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांना खुल्‍या गटातून लढत देण्‍याचाच पर्याय शिल्‍लक राहिला आहे. माजी नगराध्‍यक्ष निशांत पाटील यांचा बहुतांश भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक ३ मध्‍ये खुल्‍या गटातील महिलेचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्‍यामुळे त्‍यांना प्रभाग क्रमांक ४ चा आसरा घ्‍यावा लागू शकतो.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Video: कोणाच्या नावाचा टॅटू आहे? मैत्रिणीचं का; अजित पवार

हद्दवाढीनंतर तयार झालेल्‍या प्रभाग क्रमांक १ मधून शंकर किर्दत, महेश मोहिते, सुधाकर यादव, सतीश सूर्यवंशी, २ मधून चेतन सोळंकी, बबलू सोळंकी, संजय साठे, ३ मधून प्रभागाचे नेतृत्‍व केलेल्‍या आजीमाजी नगरसेवक किंवा त्‍यांच्‍या कुटुंबातील महिला उमेदवाराला संधी मिळू शकते. चार मधून निशांत पाटील, सुवर्णा पाटील, शंकर माळवदे, ५ मधून विजय देसाई, नीलेश मोरे, राम हादगे, सीता हादगे, अविनाश बाचल, सविता फाळके, ६ मधून लता पवार, जगन्नाथ किर्दत, अतुल चव्‍हाण, बबन पाटील-इंदलकर, राजू भोसले, ज्ञानेश्‍‍वर फरांदे, ८ मधून निलम देशमुख, किशोर गालफांडे यांच्‍यासह इतर नावे चर्चेत आहेत.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
साताऱ्याची हद्दवाढ अजित पवारांच्या सहकार्यानेच मार्गी : शिवेंद्रसिंहराजे

प्रभाग क्रमांक ९ मधून माजी पंचायत समिती सदस्‍य संजय पाटील, नवनाथ ऊर्फ बबलू जाधव, शोभा केंडे, १० मधून भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, मधुकर जाधव, विश्‍‍वतेज बालुगडे, ११ मधून वसंत लेवे, अविनाश कदम, दिलीप कडव, राजू गिरीगोसावी, १२ मधून पारंपरिक पद्धतीने किशोर शिंदे आणि जयेंद्र चव्‍हाण यांच्‍यातच लढत होण्‍याची चिन्‍हे आहेत. १३ मधून बाळासाहेब खंदारे, अनिकेत तपासे, दत्तू धबधबे, विजय बडेकर, अमीन कच्‍छी, वसंत जोशी.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
उदयनराजे म्हणतात मी संजय राऊतांना ओळखत नाही... राजघराण्याबद्दल बोललं तर याद राखा....

१४ मधून जयवंत भोसले, अलाउद्दीन शेख, नासीर शेख, स्‍मिता घोडके, अक्षय गवळी, १५ मधून रवी घोरपडे, श्रीकांत आंबेकर, भालचंद्र निकम, गणेश जाधव, योगेश चोरगे, राजेंद्र चोरगे, १६ मधून ॲड. दत्तात्रय बनकर, शेखर मोरे-पाटील, राजू भोसले, १७ मधून संग्राम बर्गे, फिरोज पठाण, बाळासाहेब महामुलकर, आशुतोष चव्‍हाण, शशिकांत पारेख, १८ मधून योगेश जाधव, विनोद ऊर्फ काका मोरे, पोपट नांगरे यांची नावे चर्चेत असून, त्‍याच प्रभागात मोरे परिवारातून चर्चेअंती एखादे नाव चर्चेत येण्‍याची शक्‍यता आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे न पटणारे; भाजप पालिका स्वबळावर लढणार 

१९ मधून सागर भोसले, अमोल नलवडे, प्रकाश घुले, मंगेश जाधव, संतोष सूर्यवंशी, २० मधून अमोल मोहिते, प्रशांत आहेरराव, धनंजय जांभळे, २१ मधून अशोक मोने, रवींद्र झुटिंग, सागर पावशे, प्रवीण अहिरे, प्रवीण पाटील, सुजाता राजेमहाडिक, २२ मधून दीपाली गोडसे, रवी पवार, प्रवीण पाटील, राजू गोडसे, कल्‍याण राक्षे, विजय काटवटे, माजी बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी २२, ११, १२, २३ या पैकी पक्ष एकातून लढण्‍याची तयारी केली आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
त्या देशांनी पंतप्रधानांना हाकलले; ती स्थिती भारतात येऊ शकते...पृथ्वीराज चव्हाण

२३ मधून लेवे कुटुंबीयांतील एकाचा चेहरा निवडणुकीसाठी पुढे येण्‍याची शक्‍यता असून, अन्‍य इच्‍छुकांसाठी दोन्‍ही आघाड्यांची चाचपणी सुरू आहे. २४ मधून रवी ढोणे, विजय चौगुले, महेश राजेमहाडिक, अतुल जाधव, २५ मधून सुहास राजेशिर्के, सूर्यकांत ऊर्फ राजू गोरे, धनंजय जांभळे यांच्‍या नावाची चर्चा आहे. पहिल्‍यांदाच निवडणुकीत खुल्‍या गटातील महिलांसाठी २१ जागा राखीव झाल्‍या आहेत. यामुळे या जागांवर खुल्‍या गटातील सक्षम महिलेची उमेदवारी जाहीर करताना सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीच्‍या नेत्‍यांना, तसेच पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com