Satara Muncipal News : सातारा पालिकेत पेटला ढाबळीचा वाद; उदयनराजेंचा गट आक्रमक

Satara Political : सातारा येथील शनिवार पेठेत असणाऱ्या राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलात अतिक्रमण करत टाकलेली कबुतराची ढाबळ काढावी, या मागणीसाठी शुक्रवारी सातारा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर खासदार उदयनराजे भोसले यांच्या माजी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले
Satara Muncipal Council
Satara Muncipal CouncilSarkarnama
Published on
Updated on

Udyanraje Bhosle group News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी निकालाची उत्सुकता सर्वानाच आहे. त्यातच आता सातारा नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी माजी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनामुळे सातारा येथील वातावरण चांगलेच तापले आहे.

सातारा येथील शनिवार पेठेत असणाऱ्या राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलात अतिक्रमण करत टाकलेली कबुतराची ढाबळ काढावी, या मागणीसाठी शुक्रवारी सातारा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या (Satara Muncipal Council) दालनाबाहेर खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle)यांच्या माजी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनात माजी नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, अलाउद्दीन शेख, इंतेखाब बागवान हे सहभागी झाले होते. तर माजी नगरसेवक वसंत लेवे आणि किशोर पंडीत यांनी उपस्‍थित राहून पाठिंबा दिला. (Satara Palika News)

Satara Muncipal Council
Vidhan Parishad Election News : लोकसभेचा धुराळा बसण्यापूर्वीच आणखी एका निवडणुकीची घोषणा; महाराष्ट्रातील वातावरण तापणार

या आंदोलनावेळी मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित नसल्याने आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरु होते. सरतेशेवटी पालिका प्रशासनाला दिलेल्‍या निवेदनानुसार कार्यवाहीचे आश्‍‍वासन दिल्‍यानंतर हे आंदोलन स्‍थगित करण्‍यात आले.उदयनराजे भोसले यांच्या गटाच्या माजी नगरसेविका स्‍मिता घोडके यांनी सातारा शहरातील शनिवार पेठेत दीड कोटी रुपये खर्चुन राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल विकसित केले आहे.

या संकुलात काहीनी अतिक्रमण करत कबुतराची ढाबळ उभी केली आहे. या ढाबळीविरोधात येथील नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्‍या होत्‍या. मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीच्‍या एका नगरसेवकांच्‍या दबावापुढे त्‍याविरोधात कारवाई होत नव्‍हती.

नागरिकांना होणारा त्रास वाढत गेल्‍याने याविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाच्या माजी नगरसेविका स्‍मिता घोडके यांनी शुक्रवारी अभिजित बापट यांच्‍या दालनाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानुसार त्‍या सकाळी अकराच्या सुमारास पालिकेत दाखल झाल्‍या. बापट उपस्‍थित नसल्‍याने स्‍मिता घोडके यांनी अलाउद्दिन शेख, इंतेखाब बागवान, सुजाता राजेमहाडिक यांच्‍यासह ठिय्‍या आंदोलन सुरु केले. आंदोलकांची अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांची भेट घेत संबधितांना नोटीसा बजावल्‍याचे सांगत आचारसंहिता शिथिल झाल्‍यानंतर कारवाई करु, असे आश्वासन दिले.

याचदरम्‍यान, सहायक मुख्‍याधिकारी अरविंद दामले यांनीही आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. चर्चेवर समाधान न झाल्‍याने दिवसभर ठिय्या मांडला व शेवटी सांयकाळी त्यांनी आंदोलन तात्‍पुरते स्‍थगित केले.

दरम्यान, याच मैदानावर असलेल्या दुसऱ्या अतिक्रमणाबाबत माजी नगरसेवक जयवंत भोसले यांनी नगरसेवकांच्‍या उपस्‍थितीत पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. चर्चेदरम्‍यान त्‍यांनी ढाबळ व त्‍यातील कबुतरांच्‍या जीवितास धोका असल्‍याच्‍या अनुषंगाने काही संस्‍थाकडे तक्रारी केल्‍याची माहिती पालिका प्रशासनास दिली.

(Edited By : Sachin Waghmare)

Satara Muncipal Council
Satara Hording News : मुंबईच्या होर्डिंग दुर्घटनेचा साताऱ्यात 'इम्पॅक्ट'; जिल्हाधिकाऱ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com