Vidhan Parishad Election News : लोकसभेचा धुराळा बसण्यापूर्वीच आणखी एका निवडणुकीची घोषणा; महाराष्ट्रातील वातावरण तापणार

Political News : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार असल्याने येत्या काळात आणखी दहा ते बारा दिवस ही रणधुमाळी सुरूच राहणार आहे.
Election Commission of India
Election Commission of IndiaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यात देशातील एकूण 428 मतदारसंघातील मतदान पार पडले. येत्या काळात सहाव्या आणि सातव्या टप्यात 115 मतदार संघात अद्याप मतदान होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार असल्याने येत्या काळात आणखी दहा ते बारा दिवस ही रणधुमाळी सुरूच राहणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच विधानपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा 16 मार्च निवडणूक आयोगाने (Election Commision) केली होती. जवळपास 80 दिवस ही निवडणूक प्रक्रिया सुरु राहणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आत्तापर्यंत जवळपास 70 दिवस उलटले आहेत. तर येत्या आठ दिवसांत उर्वरित दोन टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Vidhan Parishad Election News)

Election Commission of India
Pune Porsche Accident : विशाल अगरवाल यांचा पाय आणखी खोलात, पोलिस दोन गुन्हे दाखल करणार, कारण...

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने 10 जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनानी दावा केला होता. त्यामुळे, सुमारे 15 दिवसापूर्वीच ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती.

त्यासाठी निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणूक काही दिवस पुढे जातील असे वाटत होते. मात्र, या निवडणूक आयोगाने नव्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच हा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहेत. दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच चारही विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार होते. यापूर्वी मतदानाची तारीख 10 जून निश्चित झाली होती. मात्र, आता नवीन कार्यक्रमानुसार ह्या निवडणुकात 26 जून रोजी होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होत आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होणाऱ्या या विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय पक्षासोबतच कार्यकर्त्याचा देखील कस लागणार आहे.

Election Commission of India
Jalna Loksabh Constituency : मतदारांचा उत्साह कोणाच्या पथ्यावर? दानवे की काळे?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com