Maratha Reservation : कुणबी नाेंदीत साताऱ्याने मराठवाड्यालाही मागे टाकले; सापडल्या तब्बल २० हजार नोंदी

Maratha Kunbi सर्वाधिक १४ हजार कुणबी नोंदी पाटण तालुक्यात असून, सर्वात कमी नोंदी माण तालुक्यात सापडल्या आहेत.
Maratha Reservation
Maratha Reservationsarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर प्रत्येक जिल्ह्यात कुणबीच्या नोंदींचा शोध घेण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. गेल्या दोन दिवसांत सातारा जिल्ह्यात तब्बल २० हजारांवर कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यातील सर्वाधिक नोंदी पाटण व सातारा तालुक्यांत आहेत. मराठवाड्यापेक्षाही जास्त नोंदी सातारा जिल्ह्यात आढळतील, असा अंदाज निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कुणबी नोंदी शोधासाठी सातारा जिल्हाधिकारी Satara collector कार्यालयासह सर्व तहसील व प्रांत कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. maratha reservation गेल्या दोन दिवसांपासून सर्व तहसील कार्यालयांसह १२ विभागांकडील नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन दिवसांपासून ही कार्यवाही सुरू आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कुणबीच्या सर्वाधिक नोंदी या महसूलकडेच आहेत. त्यामुळे तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यासह शिक्षण विभाग, पोलिस अधिकारी, कर्मचारी, पालिकांचे कर्मचारी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत.

सर्व विभागांनी मिळून आतापर्यंत चार लाख ५९ हजार दस्तावेजांची तपासणी केली. यामध्ये बहुतांशी दस्तावेज हे मोदीलिपीतील आहेत. त्यातून कुणबीच्या २० हजार दोन नोंदी सर्व अकरा तालुक्यात मिळून सापडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक नोंदी या पाटण तालुक्यात असून, येथे १४ हजार नोंदी सापडल्या आहेत. maharashtra Political News

Maratha Reservation
Satara News : मराठा आरक्षणाची मागणी गांभीर्याने घ्या; माथाडी संघटना महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करेल : शशिकांत शिंदे

तर सर्वात कमी नोंदी माण तालुक्यात असून, येथे आतापर्यंत केवळ नऊ नोंदी सापडल्या आहेत. दररोज या नोंदींचा शोध घेण्यासाठी जुन्या दस्तऐवजांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक आठवड्याला हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहे. मराठवाड्यापेक्षा सर्वात जास्त नोंदी सातारा जिल्ह्यात सापडल्याने येथील मराठा समाजात दिलासादायक परिस्थिती आहे.

Edited By : Umesh Bambare

Maratha Reservation
Maratha reservation : भुजबळ साहेब, मराठा समाजाचे योगदान विसरू नका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com