Loksabha Election 2024 : महायुती नवीन चेहऱ्याच्या शोधात, विद्यमान खासदारांचाही दावा कायम !

Bhavana Gawali : राजकीय उलथापालथीत विद्यमान खासदार भावना गवळी शिंदे गटासोबत शिवसेनेत गेल्या.
Bhavana Gawali, Mohini Naik and Sanjay Rathod
Bhavana Gawali, Mohini Naik and Sanjay RathodSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याचे संकेत आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रमुख राजकीय पक्षांत इच्छुकांकडून उमेदवारीसाठी दावेदारी केली जात आहे. खरी लढत ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच होणार आहे. विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिवसेना (शिंदे) कडून दावेदारी केली आहे. तर, महायुतीकडून नवीन चेहऱ्याचा शोध घेतला जात असल्याने त्यांची दावेदारी मोडीत तर निघणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सन 1999 पासून शिवसेना तब्बल पाच निवडणुकांमध्ये विजयी झाली आहे. शिवसेनेची टक्कर काँग्रेस उमेदवारासोबत होत राहिली. मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथीत विद्यमान खासदार भावना गवळी शिंदे गटासोबत शिवसेनेत गेल्या. या मतदारसंघात शिवसेनेचा दावा कायम आहे. महायुतीत सहभागी असलेले भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून सावधगिरीने चाचपणी करण्यात येत आहे. खासदार गवळी यांनी यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे पाच टर्म लोकसभेत नेतृत्व केले आहे.

Bhavana Gawali, Mohini Naik and Sanjay Rathod
Yavatmal : रश्मीताईंचा घेतला धसका, शिंदेंनी केल्या 'या' नियुक्त्या, पण भावनाताईंना विदर्भापुरतेच मर्यादित ठेवले !

2014 व 2019च्या निवडणुकीत त्यांना मोदी लाटेने तारल्याची भावना महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. केवळ निवडणूक आली की, खासदारांचे मतदारांना दर्शन होते. इतरवेळी त्या मतदार तर सोडाच पण पदाधिकाऱ्यांपासूनही दूर राहत असल्याचा सूर आहे. खासदार गवळी यांचा लोकसभा उमेदवारीचा पत्ता कट झालाच पाहिजे, यासाठी महायुतीतील बडे नेते रणनीती आखत असल्याचीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव शिवसेनेकडून चर्चेत आले होते.

भारतीय जनता पक्षानेही मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावेदारी केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी मेळाव्यात ‘बंजारा’ उमेदवाराचे ‘कार्ड’ पुढे आणले. त्यामुळे मोहिनी नाईक यांनाही उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता निर्माण झाली. त्यानंतर खासदार गवळी प्रत्येक सभेत आणि भेटीत ‘मेरी झाँसी नही दुंगी’, अशी घोषणा करीत आहे. उमेदवारी न मिळाल्यास दारव्हा-दिग्रस मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

त्यांनाही आपली उमेदवारी कुठेतरी ’बॅकफूट’वर गेल्यासारखे वाटत आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघ शिवसेनेसाठी सुरक्षित राहिला असला तरी महायुतीच्या नेत्यांकडून खासदार गवळींचे नाव कुणीही प्रत्यक्ष घेताना दिसत नाही. महायुतीत मतदारसंघावर दावे-प्रतिदावे केला जात आहे. आपली दावेदारी कायम राहावी, यासाठी विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सलगी साधण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे सेनेतही नाराजीचा सूर..

शिवसेना एकसंघ असताना खासदार गवळी व पालकमंत्री राठोड यांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांत दोन गट पडले होते. त्यावेळी पदाधिकाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या झडलेल्या फैरी सर्वश्रुत आहे. राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यावर खासदार गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. प्रारंभी शिवसेनेचे बडे नेते एकत्र आल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले. मात्र, उमेदवारीसाठी नाव समोर येताच शिवसेनेचे पदाधिकारी व नेते खासदार गवळीच उमेदवार, असा दावा करताना दिसत नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांत खासदार गवळींबद्दल नाराजीचा सूर खासगीत उमटत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com