Satara Crime: कुटुंब शेतकरी, परिस्थिती हलाखीची,तरी जिद्दीनं झाली मेडिकल ऑफिसर; डॉक्टर तरुणीच्या धक्कादायक एक्झिटनं अख्खं गाव हळहळलं

Satara News : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळून आली आहे.
 Police crime
Police crimeSarkarnama
Published on
Updated on

Satara News: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीनं गुरुवारी (ता.23) रात्री भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनं सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. पोलिसांच्या तपासात तरुणीबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे.

फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळून आली आहे. या नोटमध्ये पोलिस (Police) निरीक्षक गोपाल बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचं म्हटलं आहे.

तसेच प्रशांत बनकर याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख आहे. डॉक्टर महिलेनं दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना याबाबत पत्रही दिलं होतं. त्यात तिनं पोलिस आणि खासदारांचे दोन पीएंकडून राजकीय दबाव येत होता,असं म्हटलं होतं.

संबंधित मयत डॉक्टर तरूणीची शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीही आता समोर आली आहे. ही तरुणी मूळची बीड (Beed) जिल्ह्यातील आहे. ती शेतकरी कुटुंबातून पुढे आली होती. मृत डॉक्टर तरुणीला चार सख्खी भावंडंही आहेत. आईवडिलांनी हलाखीची परिस्थिती असताना मुलीला शिक्षणासाठी पाठिंबा दिला होता. तिनेही परिस्थितीशी झुंज देत जिद्दीनं शिक्षण पूर्ण करत वैद्यकीय शाखेची डिग्री मिळवली होती.

 Police crime
Malegaon fake birth registration : मालेगावात 3977 बनावट जन्म दाखले रद्द; 811 आरोपी, 47 वकिलांना अटक, 125 एजंट अन् 35 अधिकाऱ्यांवर कारवाई

डॉक्टर तरुणीच्या काकांचं कुटुंब हे उच्चशिक्षित असल्यानं तिनंही शिक्षणाचं महत्व लक्षात घेत अभ्यासावर प्राधान्य दिलं. दहावीपर्यंतच शिक्षण बीड शहरातल्या शाळेत घेतल्यानंतर जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर तिला पहिली पोस्टिंग महाबळेश्वरमध्ये मिळाली. तिथे सुमारे 6 महिने कंत्राटी पद्धतीनं काम केल्यानंतर दीड वर्षांपूर्वी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली होती.ही डॉक्टर तरूणी अविवाहित होती. दिवाळीत सुट्टी न मिळाल्यानं डॉक्ट तरुणी ही पुढील आठवड्यात गावी जाणार होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांना फोन करून तत्काळ पोलिसांना निलंबित करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणाची दखल महिला आयोगाने देखील घेतली असून संबंधितांवर कठोर कारवाईच्या सूचनाही पोलिसांना दिल्या आहेत.

 Police crime
Gopichand Padalkar : पडळकरांनी जयंत पाटलांना पुन्हा डिवचले; ‘राजारामबापू पाटील कारखान्याचे नाव बदलणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार’

गेल्या वर्षभरापासून तरुणी प्रचंड तणावाखाली होती.तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा मोठा दबाव होता.राजकीय नेत्यांच्या आणि पोलिसांच्या सांगण्यावरून पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करायचा, रुग्णालयात घेऊन न येता त्यांना फिटनेस,अनफिटनेस सर्टिफिकेट देण्याचा दबाव होत होता.तिने टोकाचे पाऊल उचलण्याआधी जी हातावर नावे लिहिली आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही मयत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांनी यावेळी केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांना संबंधित तरुणीनं पोलिसांना पत्रही दिले होतं. त्यात पोलिस आणि खासदारांचे दोन पीएंकडून राजकीय दबाव येत असल्याची गंभीर बाब समोर आणली होती. गोपाल मदने सोबतच पोलिस निरीक्षक महाडिक यांचाही त्या पत्रात उल्लेख असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.

 Police crime
Maharashtra Politics : वैर संपले, फडणवीस-जरांगे पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर येणार, नेमकं काय कारण..?

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचे काका आणि आतेभावानं गंभीर आरोप केले आहेत. पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता,तसेच तिने तिच्या वरिष्ठांना आणि नातेवाईकांनाही तणावामुळे माझं आयुष्य संपवावं लागेल असं सांगितल्याचंही ते म्हणाले.त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती.याचदरम्यान,तरूणीला फोन करणारे फलटण भागातील खासदारांचे पीए होते,असं गंभीर आरोप केल्यानं या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com