

Malegaon fake documents issue : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखलांचा पाठपुरावा सुरूच आहे. मालेगाव इथल्या बनावट जन्म दाखल्यांचा पाठपुरावा किरीट सोमय्या यांनी सुरूच ठेवला आहे.
किरीट सोमय्या यांनी आज महापालिका अधिकारी आणि अप्पर पोलिस अधीक्षकांची चर्चा करत प्रकरणाची माहिती घेतली. मालेगावात 3 हजार 977 बनावट जन्म दाखले रद्द करण्यात आले असून, यात 7 गुन्ह्यांमध्ये 811 जणांना आरोपी करण्यात आलं आहे.
मालेगाव (Malegaon) बनावट जन्म दाखले प्रकरण हे एका मोठ्या घोटाळ्याशी संबंधित आहे, असा किरीट सोमय्या यांचा सुरूवातीपासून आरोप आहे. यात बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांना भारतीय नागरिक असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकरणात अधिकारी आणि नागरिकांवर देखील गुन्हे दाखल झालेत.
महसूल विभागातील तहसीलदार अन् नायब तहसीलदांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ED) सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनीही छापेमारी केली आहे. असे असले तरी या प्रकरणाचा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पाठपुरावा करत, आज मालेगाव महापालिकेतील अधिकारी आणि अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट घेत चर्चा केली.
मालेगावमध्ये 3 हजार 977 बनावट जन्म दाखले रद्द करण्याचा आदेश देण्यात आले असून, त्यातील 3 हजार 276 जन्म प्रमाणपत्र 56 मृत्यू प्रमाणपत्र अर्जदार घेऊन गेले, तर 700 जण जन्मदाखला तयार होऊनही घेऊनच गेलेले नाही. आतापर्यंत या प्रकरणी 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 811 जणांना आरोपी करण्यात आले.
आरोपींमध्ये 47 वकिलांचा समावेश असून, त्यांना अटक करण्यात आली. 125 एजंट, 35 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. हे सर्व बनावट प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. 2 हजार 214 जन्म प्रमाणपत्र महापालिकेने परत घेतले आहे, तर 946 लोक प्रमाणपत्र घेऊन गायब झाले.
जन्म प्रमाणपत्र घेऊन पसार झालेल्यांना त्यांना फरार घोषित करावे. यंत्रणांमार्फत पसार झालेल्यांचा तपास करावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली. तपास अद्याप सुरू आहे. आरोपींची संख्या एक हजारावर पोहोचेल, असे सांगताना, मालेगावचा जन्म दाखला घोटाळा देशातील मोठा घोटाळा असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणात तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आॅगस्टमध्ये तपासाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. या प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी 2025 मध्ये विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं होतं. यानंतर या पथकाला एक महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.