Satara : 259 ग्रामपंचायतींसाठी 927 केंद्रांवर आज मतदान

Voting For grampanchyat सर्वच राजकिय पक्षांनी ग्रामपंचायतीत निवडणूकीत लक्ष घातल्याने चुरशीने मतदान होण्याची शक्यता आहे.
Satara Grampanchayat Election
Satara Grampanchayat ElectionSarkarnama

सातारा : जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायतींसाठी उद्या (रविवारी) ९२७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होत आहे. त्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी साहित्यासह नेमूण दिलेल्या ग्रामपंचायतीतील केंद्रांकडे आज रवाना झाले. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच यावेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेच्या मार्गाने पार पडण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. यावेळेस सर्वच राजकिय पक्षांनी ग्रामपंचायतीत निवडणूकीत लक्ष घातल्याने चुरशीने मतदान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४७ ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध झाल्या तर १३ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २५९ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया होणार आहे. आठ ग्रामपंचायतीत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. २५९ ग्रामपंचायतींसाठी जिल्ह्यातील ९२७ केंद्रांवर उद्या (रविवारी) मतदान प्रक्रिया होणार आहे.

सर्वाधिक ७१ ग्रामपंचायती पाटण तालुक्यात त्यापाठोपाठ कोरेगाव तालुक्यात ४३, कराड ३३, सातारा २९, माण २८, फलटण २०, खटाव १२, जावळी ११, वाई सात, खंडाळा दोन तर महाबळेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकुण चार लाख ४३ हजार ४८१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये दोन लाख १५ हजार ६७३ स्त्री तर दोन लाख २७ हजार ८०५ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

Satara Grampanchayat Election
Satara News: जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकांना दमदाटी; साताऱ्यात एकावर गुन्‍हा

या मतदानातून २४२ सरपंच आणि २४६ सदस्य निवडले जाणार असून त्यातून सरपंच पदासाठी ६४८ उमेदवार तर सदस्य पदासाठी ३८९४ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळेस कोरेगाव आणि पाटण तालुक्यात चुरशीच्या लढती आहेत. पाटणला पालकमंत्री शंभूराज देसाईंची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात आपली ताकत कायम ठेऊन जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राखावे लागणार आहे.

Satara Grampanchayat Election
Satara News: उदयनराजे म्हणतात, चोरी करणाऱ्यांची बोटे छाटा.. बलात्काऱ्यांचे...

तर राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढून सर्वाधिक ग्रामपंचायती मिळविण्याचा चंग भारतीय जनता पक्ष, बाळसाहेबांची शिवसेना यांनी बांधला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी ९५० पोलिस व होमगार्ड बुथवर बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत.

Satara Grampanchayat Election
Mahavikas aghadi maha morcha : महामोर्चात न येण्याचं अशोक चव्हाणांनी दिले 'हे' कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com