चंद्रकांतदादांनी महादेवराव महाडिकांची उणीव भरून काढली!

कोल्हापूरमध्ये पोटनिवडणुकीमुळे (Assembly by-elections) राजकीय वातावरण तापले आहे.
Chandrakant Patil and Satej Patil
Chandrakant Patil and Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Assembly by-elections) मतदार पैसे घेवून मतदान करतात. असे म्हणत भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मतदारांचा अपमान केला आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे जातील त्यांची ईडी मार्फत चौकशी करणार, अशीही धमकी चंद्रकांतदादांनी दिली. असल्याचा आरोप काँग्रेसचे (Congress) नेते व पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला. तर, काहीही आरोप करत राहिल्यामुळे चंद्रकांतदादांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उणीव भरून काढली असल्याचा टोला सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या सभेवर झालेल्या दगडफेकीची सखोल चौकशी करावी. शहरात प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक भाजप नेत्याला कोल्हापूर जिल्ह्यात कमी असतील तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातून पोलीस फौज मागून सुरक्षा द्यावी. जे दगड मारून पळून गेले ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला गेले याचीही चौकशी करण्याच्या सूचना पोलिसांना केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Chandrakant Patil and Satej Patil
मोदी साहेबांच्या कृपेने पेट्रोल लवकरच 150 रुपये प्रतिलिटर होईल : जयंत पाटलांचा टोमणा

यावेळी पालकमंत्री म्हणाले, कोल्हापूरमध्ये पैसे घेवून मतदान करण्याची प्रथा किंवा परंपरा नाही. कोल्हापूरमध्ये हे अजिबात खपूवन घेतले जात नाही. त्यामुळे पेटीएमद्वारे पैसे घेवून मतदान केले जाणार असल्याचा आरोप करुन चंद्रकांतदादांनी मतदारांचा अपमान केला. स्वाभिमानी मतदार 12 तारखेला दांदाच्या वक्तव्याचा समाचार घेतील. एक हजार रुपयांसाठी आम्ही ईडीसुध्दा लावू शकतो. या वक्‍त्यवाचा अर्थ काय? याचा अर्थ सर्वसामान्य लावू लागले आहे. त्यांनाही आता या यंत्रणाना दादांच्या इशाऱ्यावर चालतात का असा सवाल सर्वसामन्य लोकांन्याकडून केला जात आहे.

चित्रा वाघ यांच्या सभेबद्दल सतेज पाटील म्हणाले, निवडणूकीच्यापार्श्‍वभूमीवर विकास थांबवण्याचे काम सुरु आहे. कोल्हापूरच्या द्वेषापोटी त्या हे बोलल्या आहेत. हजारो पोलीस कोल्हापूरमधील महिलांना सुरक्षा देतात, चांगले वातावरण असताना ते बिघडवण्याचे काम कोणी करु नये. यामध्ये कोल्हापूरची बदनामी होत आहे. कालची घटना घडली, त्यामागे कोण आहेत, भाजपने ती एकच सभा लाईव्ह कशी काय केली नाही, अशा अनेक मुद्‌द्‌यांवर चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

याशिवाय, कोल्हापूरात येणाऱ्या प्रत्येक भाजप नेत्याला कडक सुरक्षा द्या, आपल्याकडे पोलीस कमी असतील तर सांगली-सातारा जिल्ह्यातून पोलीस मागविण्याच्याही सूचना दिल्या आहेत. भविष्यात भाजप स्वत:च असे काही तरी करेल हे आता सिध्द झाले. चुकीचे काही तरी सांगून कोल्हापूरची बदनामी करु नका, असेही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil and Satej Patil
कोल्हापुरात पराभव दिसत असल्यानेच भाजप ईडीच्या आश्रयाला!

सोशल मिडियावर मतदारांची ईडीद्वारे चौकशी करणार म्हणालेल्या चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्याची खिल्ली उडवली जात आहे. माझे कोणते देणे असेल तर 12 तारखेपर्यंत पेटीएमवरून देवू नको, नाहीतर दादा ईडी मागे लावतील, अशे संदेश सोशल मिडियावर फिरत असल्याचेही सतेज पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com