Satej Patil : "बदलापूरच्या घटनेनंतरही..." बीड, परभणीतील हत्या प्रकरणावरून सतेज पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Satej Patil On CM Fadnavis : बीड, परभणीतील घटना पाहता राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली आहे की नाही? हा प्रश्न निर्माण होतो, असा म्हणत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कळंबा येथील तपोवन मैदान येथे सुरू झालेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
Satej Patil On Akshay Shinde Encounter
Satej Patil On Akshay Shinde EncounterSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 28 Dec : विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालाचे आत्मपरीक्षण केलं जाणार आहे. या सगळ्याचा अभ्यास प्रदेश काँग्रेस (Congress) म्हणून आम्ही करत आहोत. सत्तेसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केला. त्या पद्धतीने राज्याला पुढे घेऊन जाण्या संदर्भातले प्रयत्न दिसत नाहीत. बीड, कल्याणनंतर परभणीमधील घटना घडली.

बदलापूरच्या घटनेनंतर देखील राज्याचे गृह खाते सुधारलेले दिसत नाही. कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिली आहे की नाही? हा प्रश्न निर्माण होतो, असा म्हणत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कळंबा येथील तपोवन मैदान येथे सुरू झालेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या निधनावर बोलताना ते म्हणाले, "भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारं नेतृत्व हरपलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोल्हापुरात काँग्रेसतर्फे श्रध्दांजली वाहिली. देशाच्या अर्थकारणाचा पाया डॉ. मनमोहन सिंग यांनी रचला. सामान्य माणसाला आधार देण्याचा अर्थकारण सिंग यांनी केलं आहे."

Satej Patil On Akshay Shinde Encounter
BJP Maharashtra President News : मोदी - शाह यांचं महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र; प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा, 'या' नेत्याचं नाव फायनल?

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बेळगावमधील कार्यकारणीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं. कार्यकारणीमध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतले असून भविष्यकाळात कोणत्या दिशेने जायचं त्याबद्दल चर्चा यामध्ये झाल्याचं सांगत राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत तुमचे नाव आघाडीवर आहे, या प्रश्नावर बोलताना सतेज पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, असं म्हणत जास्त बोलणं टाळळं.

दरम्यान, राज्याचे अर्थकारण बिघडलंआहे. शिक्षकांचा पगार वेळेवर होतो की नाही अशी शंका आहे. या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण अशी झाली. त्याचे परिणाम आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या प्रश्नावर कुणाचीही गय केली जाणार नाही असं म्हटलं आहे. आता महाराष्ट्राची जनता कारवाई काय होते याची वाट बघत आहे.

Satej Patil On Akshay Shinde Encounter
Ncp News : राज्य मंत्रिमंडळातील नाराजीनाट्य संपेना; अजितदादांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांने स्वीकारला नाही पदभार

मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा नेमका कुणाकडे होता? कुणालाही सोडणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. विधिमंडळात बीड, परभणी प्रकरण असेल या सगळ्यावर चर्चा झाली. मात्र, सरकार म्हणून काही भूमिका घेतली आहे. हे आम्हाला दिसले नाही. असा आरोप सतेज पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com