Kolhapur Politics : 'शाहू महाराजांबद्दल आदरच; पण...' ; लोकसभा उमेदवारीच्या चर्चेवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

Satej Patil on Sharad Pawar Tour : येत्या २५ तारखेला शरद पवारांच्या स्वागताला आम्ही जाणार : सतेज पाटील
Shahu Maharaj-Satej Patil
Shahu Maharaj-Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. त्याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. पण, त्यांची स्वतःची इच्छा काय आहे, हे पाहावे लागेल. शाहू महाराज यांच्याशी मी राजकीय चर्चा केलेली नाही. पण, शेवटी कोल्हापुरातून पुरोगामी विचारांचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा, अशी आमची अपेक्षा आहे, असे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत सांगितले. (Satej Patil of Congress reacts to discussion of Shahu Maharaj's Lok Sabha candidature...)

आमदार सतेज पाटील हे कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा आहे. येत्या २५ ऑगस्टला कोल्हापुरात आल्यानंतर महाविकास आघाडीचा घटक काँग्रेस म्हणून आम्ही त्यांचे स्वागत करणार आहोत. कोल्हापूरकरांचे शरद पवारांवर नेहमी प्रेम राहिलेलं आहे, त्यामुळे त्यांची सभा प्रचंड होईल, असं मला वाटतं. कोल्हापूरशी त्यांचा पहिल्यापासून ऋणानुबंध आहे, त्यामुळे लोकही त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद देतील, अशी आम्हाला खात्री आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तीनही पक्ष लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. हे तीनही पक्ष राज्यातील ४८ मतदारसंघात चाचपणी करत आहेत. उमेदवार कोण असावा याबाबतची अंतिम चर्चा मुंबईतील बैठकीत होईल. जागा वाटपाबाबत काही मतदारसंघाचे चित्र येत्या महिनाअखेर स्पष्ट होईल. काँग्रेस म्हणून आम्ही कोल्हापूरवर दावा केलेला आहे. आता तीनही पक्ष एकत्रित बसतील, त्यावेळी अंतिम निर्णय होईल, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.

Shahu Maharaj-Satej Patil
Sharad Pawar Kolhapur Sabha : पवारांच्या कोल्हापुरातील सभेचे अध्यक्ष शाहू महाराज म्हणाले, ‘खासदार व्हावं, अशी माझी पूर्वी इच्छा होती’

सप्टेंबरमध्ये राज्यातील ‘मुख्य’ खुर्ची बदलेल, या विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर बोलताना सतेज पाटील म्हणाले की, कधी काय होईल, हे सांगता येत नाही, असे वातावरण दुर्दैवाने महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. त्याचा परिणाम प्रशासनावर आहे, लोकांची कामं होत नाहीत. विकास कामांचे पैसे मिळत नाहीत, नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. नेमकी सत्ता कोणी चालवायची, असा वाद त्यांच्यामध्ये आहे

Shahu Maharaj-Satej Patil
Vijay Wadettiwar Big Statement : सप्टेंबरमध्ये राज्यातील ‘मुख्य’ खुर्ची बदलणार; वडेट्टीवारांच्या दाव्याने पुन्हा खळबळ

तीन पक्षांवरून आमच्यावर (महाविकास आघाडी) टीका केली जायची. पण, आता त्यांची परिस्थिती तीच आहे. आमच्या वेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात हे एकदिलाने काम करायचे. पण, आता आपण बघतोय, कोण जेवायला जात नाही, कोण जातंय अशा गोष्टी पहायला मिळत आहेत. त्याचा परिणाम विकासावर होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Shahu Maharaj-Satej Patil
Amarsinh Pandit Emotional Post : पवारांच्या टीकेनंतर अमरसिंह पंडितांची भावनिक पोस्ट; ‘श्रद्धेय साहेब, मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही’

अजित पवारांनी दोन दिवसांत आयुक्त पाठवतो, असे पंधरा ऑगस्ट रोजी सांगितले होते. पण चार दिवस उलटूनही अजून आयुक्त मिळालेला नाही. यावरून सरकार किती गतिमान आहे, हे कळते, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला. तसेच, लोकसभा निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे, त्यादरम्यान अनेक घडामोडी घडणार आहेत, असं सूचक विधानही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com