Kolhapur News : राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने आणि खोटे आरोप केले जात असून यातूनच राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झडत आहेत.
त्यामुळे काँग्रेसने सत्ताधारी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली हाय कमांड टीमकडून राज्यातील प्रमुख नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांचे नाव असून सत्ताधाऱ्यांनी आरोप केल्यानंतर त्यांची वस्तुस्थिती पुढे आणून त्यांचा बुरखा फाडणार आहेत.
राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा (BJP) माहिती तंत्रज्ञान विभाग (आयटी सेल) विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, व्हिडिओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवित आहेत. फेक मोर्फ तयार करून जनतेची काँग्रेस नेत्यांबद्दल दिशाभूल करत आहेत.
त्यामुळे राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधान्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी काँग्रेसकडून राज्यातील 15 नेत्यांची नावे निश्चित केली आहेत. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने प्रवक्त्यांकडे याबाबची जबाबदारी सोपवली आहे.
कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) हे देखील आता राज्यातील राजकीय घटनांमध्ये सक्रिय झाले आहेत.राजकीय आरोपांना उत्तर देण्याबरोबरच राज्यसभा, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला करिष्मा दाखवून दिला आहे. जिल्ह्यातील राजकारणावर पकड निर्माण होत असताना राज्यातील राजकीय क्षेत्रावर प्रभाव टाकलेला आहे. या 15 नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज च्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अॅड.यशोमती ठाकूर, अमित देशमुख , डॉ. विश्वजित कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा हे नेते पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमांशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाणार आहेत.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.