Ranjitshinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील नेमके कुणाचे? भाजप की विधानसभेला नवा डाव टाकणार?

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीवेळी रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू होती.
Ranjitshinh Mohite Patil
Ranjitshinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 July : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षापासून चार हात लांब राहिलेले विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्रदेश महाअधिवेशनाला पुण्यात हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीवेळी रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू असताना त्यांनी भाजपच्या अधिवेशनाला लावलेले हजेरी महत्वाची मानली जात आहे, त्यामुळे रणजितदादा नेमके कोणाचे, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून (BJP) इच्छुक होते. मात्र, भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या प्रचारापासून अलिप्त राहिले होते. भाजप नेत्यांच्या सभेलाही ते उपस्थित राहिले नव्हते, त्यामुळे रणजितसिंह हे भाजपसोबतच राहणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार, अशी चर्चा त्यावेळीही रंगली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकलूज येथील सभेलाही ते उपस्थित राहिले नव्हते. त्या सभेला जाण्यापूर्वी फडणवीस यांच्या स्वागतासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत न स्वीकारता निघून गेले होते. त्या घटनेचीही चर्चा राजकीय वर्तुळात चवीने चर्चिली गेली होती, त्यामुळे रणजितदादांचे भाजपमध्ये मन रमेल का, अशी चर्चा त्यावेळी होती.

दरम्यान, मोहिते पाटील कुटुंबीयांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घडामोडींमध्ये आमदार रणजितसिंहांचा कूटनीती आखण्यात सहभाग होता, अशी कुजबूज होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा त्यावेळी आणि आताही सुरू आहे. मात्र, मोहिते पाटील यांनी त्यावर कुठलेही भाष्य केलेले नव्हते.

रणजितसिंह यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी मात्र माढ्यातून मोहिते पाटील कुटुंबीयातील कोणीही निवडणूक लढवणार नाही. त्यानंतरही कोणी निवडणूक लढवली तर त्याच्या विरोधात मी प्रचाराला उतरेन, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे माढ्यातून विधानसभेला नक्की निवडणूक कोण लढवणार, अशी चर्चा रंगली आहे.

Ranjitshinh Mohite Patil
Amit Shah : अमित शहांच्या भाषणात शरद पवार लक्ष्य

रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या अधिवेशनाला सहभागी झाल्याने ते भाजपसोबतच राहणार की आगामी विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार यांच्या पक्षात सामील होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे भाजप आता मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या विचारात नसल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मदत भाजप घेऊ शकते, त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील नेमके कोणाचे, अशी चर्चा सुरू आहे

Ranjitshinh Mohite Patil
Sharad Pawar : भटकती आत्मा ते भ्रष्टाचारींचे सरदार; पवारांवरील टीका भाजपला विधानसभेत तारणार की मारणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com